Uncategorized

…..” वाढदिवस एका विकास पर्वाचा – कर्जत नगरीच्या सुवर्ण काळाचा “…….

अष्टपैलू कार्यकिर्द - करोडोंची बक्षिसे यामुळे " कर्जत नगर परिषद " राज्यात झोतात !

माजी नगराध्यक्षा ” सौ . सुवर्णा केतन जोशी ” यांचा विकास कामांचा झंझावात कर्जतच्या राजकीय इतिहासात ” सुवर्ण ” अक्षरातील नोंद….. 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –  

कोरोना सारख्या महाभयंकर महामारीत ” रणरागिणी ” सारखी उभी राहून ” हिरकणी ” साजेशी भूमिका घेत , माझ्या ” माय बाप ” जनतेची सुरक्षा करणाऱ्या कर्जत नगर परिषदेच्या तत्कालीन थेट नगराध्यक्षा ” सौ. सुवर्णा केतन जोशी ” यांचा ” झुंझार कार्यकाळ ” सर्वांच्याच लक्षात आहे . त्यांच्या कर्जत नगरीच्या विकास कार्याची ” झंझावती ” आलेख देखील सर्वांनी पाहिला आहे . प्रत्येक प्रभागात करोडो रुपयांची कामे करून कायापालट करून मी कुठल्या पक्षाची नगराध्यक्ष नसून संपूर्ण कर्जत नगरीच्या जनतेची ” वारसदार ” आहे , हे त्यांनी कार्यातून दाखवून दिले . राज्याचा निधी कर्जत नगरीत आणून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांतून त्यांनी आपले बुद्धी चातुर्य दाखवले . महिला सक्षमीकरणासाठी ठोस पाऊले उचलून त्यांनी महिलांचे हात मजबूत केले . अश्या विविध रंगांनी मा. नगराध्यक्षा सौ सुवर्णा जोशी यांनी कर्जत नगरीला विकास कार्यांनी नटविले . म्हणूनच ” लखलखनारा ” त्यांचा हा ” सुवर्ण काळ ” कर्जतची जनता कधीच विसरणार नाही .

        त्यांच्या नगराध्यक्षा पदाच्या काळात आलेल्या महापूर , अतिवृष्टी , अवकाळी पाऊस , कोरोणा महामारि या संकटांना त्यांनी ” सामना ” करून कर्जतकरांची सुरक्षा जपली . कर्जतच्या विकासाकडे झेप घेवून व स्वच्छ कर्जत अभियान यशस्वी करून पालिकेला अडीच करोड रुपयांचे पारितोषिक त्यांच्या कार्यकाळात मिळाले . यामुळे कर्जतचे नाव राज्यभर पसरले . ” वसुंधरा स्वच्छता अभियान ” त्यांनी यशस्वी राबवले . महापुरात स्वयंसेवक नेमने , हि त्यांच्याच तल्लख बुद्धीने जाणले , म्हणूनच अतिवृष्टीत अडकलेल्या प्रत्येक घरापर्यंत मदत घेऊन त्या स्वतः जाऊ शकल्या . अनेक ” आरोग्य शिबिरे ” त्यांनी भरवून नागरिकांच्या डोक्यावरील आजारांचा खर्चाचे ओझे कमी केले . हळदी कुंकू , होम मिनिस्टर , मानाची पैठणी यांसारखे कार्यक्रम करून त्यांनी महिलांना संसारातील कर्तव्यातून मनमोकळे रहाण्यास उसंत मिळावी , म्हणून कार्यक्रम राबविले . वसुंधरा अभियाना अंतर्गत हरित शपथ ग्रहण करून महिलांनी वर्षभरात १० झाडे प्रत्येकी लावण्याचे वचन ग्रहण करून निसर्गाचा समतोल राखण्याचे महान कार्य केले . त्यांच्या कार्य काळात बचत गटाचे सभासद , स्वयंसेवक , डॉ , पत्रकार , कोरोना योद्धा , आरोग्य दूत , स्वच्छता दूत यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला . 

      स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत प्राप्त बक्षीस स्वरूपात मिळालेल्या निधीमधून ” कोपरा गार्डन ” सुशोभीकरण कार्य करून कर्जत शहराचे संस्कृतीकरण होऊन एक वेगळेच सौंदर्य वाढले . महिला व बालकल्याण समिती अंतर्गत अनेक महिलांना प्रशिक्षण दिले . महिलांसाठी सुरक्षेसाठी पोलीस स्टेशन मार्फत धडे दिले . कर्जतचे नाव रोशन करणाऱ्या सिनेतारका – अभिनेत्री जुई गडकरी यांचा सत्कार करून ” कलेला ” प्राधान्य दिले . अंडर ग्राउंड गटार , रस्ते करून नागरिकांची सुरक्षा जपली . स्वच्छ भारत अभियानात ” टॉप ३ ” मध्ये येण्याचा बहुमान नगराध्यक्षा सौ सुवर्णा जोशी यांच्या प्रयत्नानेच मिळाला . पालिकेला अनेक ” पुरस्कार ” त्यांनी मिळवून दिले . तर शैक्षणिक क्षेत्रात देखील अनेक शाळांना , विद्यार्थ्यांना त्यांची मोलाची मदत असते . 

त्यांच्या कार्यकाळात कर्जत नगरीत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन बरीच विकास कामे झाली , म्हणूनच त्यांना सामाजिक संस्था , लोकशाहीचा चौथा स्तंभ लोकमत या वृत्तपत्रांनी सन्मान चिन्ह व ५१ हजाराचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले , ते बक्षीस त्यांनी कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या अनाथ बालकांना मदत रुपी दिले . स्वच्छता अभियानाचे सातत्याने ४ वर्षे पुरस्कार मिळाल्याने याचे श्रेय नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनाच जाते . त्यांची राजकीय कार्यकिर्द देखील ” अविस्मरणीय ” असून ठाकरे शिवसेना पक्षाच्या जिल्हा संघटिका म्हणून त्या यशस्वी ठरल्या आहेत . कला – क्रीडा – खेळ – कुस्ती – क्रिकेट यांना प्राधान्य देत ” स्वर्गीय अनंत काका जोशी ” यांचा वारसा त्या पुढे चालवित आहेत . त्यांच्या रुपाने ” अनमोल रत्न ” कर्जत नगरीला मिळाले . माजी नगराध्यक्षा सौ . सुवर्णा जोशी यांची विकास कामांची , सामाजिक कार्याची , महिला सक्षमीकरणाच्या बहु गुणांची कार्यकिर्द म्हणूनच त्या सन २०२६ मध्ये तिसऱ्यांदा निवडून येऊन नगरसेविका झाल्या व विक्रम केला आहे .  कर्जतच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंद व्हावी , अशीच ” लखलखणारी ” ठरली असून पुढेही त्यांचे कार्य असेच ” तळपत ” राहू दे , अशीच ईश्वर चरणी त्यांच्या १८ फेब्रुवारी २०२६ रोजी वाढदिवसानिमित्त प्रार्थना .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!