Uncategorized

….” उपजिल्हा रुग्णालय व कर्जत नगर परिषद विरोधात रमेश दादा कदम यांचे उपोषणाला सुरुवात “…..

पोलीस मित्र संघटना लढणार " आर पार " ची लढाई !

” सोई सुविधा – भ्रष्टाचार – मनमानी कारभाराच्या व आदिवासी महिला मृत्यू प्रकरणाची  ” चौकशीची मागणी…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुका हा ” आदिवासी ” बहुल भाग आहे . तर इथे कष्टकरी – कामगार – गोर गरीब रोजंदारीनें काम करणारे स्थानिक भूमी पुत्र , महिला वर्ग असल्याने इथे आजारी रुग्ण मोठ्या प्रमाणात पहाण्यास मिळतात , मात्र सर्व प्रकारच्या आरोग्याच्या सोयी सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी करूनही येथे कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक ( मनोरुग्ण तज्ञ ) म्हस्कर यांचा मनमानी कारभार बळावत चालला आहे . तर कर्जत नगर परिषदेच्या प्रशासकीय काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्यावर करत नागरिकांना बकाल जीवन जगण्यास भाग पाडण्यास मुख्याधिकारी ” तानाजी चव्हाण ” हे अग्रेसर असल्याने या विरोधात सर्व सामान्य जनतेस न्याय देण्यासाठी ” पोलीस मित्र संघटनेने ” दंड थोपटले असून संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ” रमेश दादा कदम ” आज बुधवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता लोक. टिळक चौक येथे ” बेमुदत आमरण उपोषणास ” सुरुवात केली आहे . 

     

  यावेळी पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या विरोधात १२ मागण्या तर कर्जत नगर परिषदेच्या विरोधात ११ मागण्या घेऊन ” आर पार ची लढाई ” लढणार आहेत . त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी ते गेली १ महिना खस्ता खात न्याय मागत असताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, रायगड – अलिबाग, तर मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष न दिल्याने अखेर रमेश दादा कदम यांनी उपोषणाचे हत्यार उगारले असून त्यांचे हे प्रशासनाच्या विरोधातील ३३ वे आमरण उपोषण आहे . यासंदर्भात जिल्हा रुग्णालयातून त्रीसदस्यीय चौकशी समिती नेमली असून १) डॉ.किरण शिंदे निवासी वैद्यकीय अधिकारी – जिल्हा रुग्णालय , अलिबाग २) श्रीमती मनिषा कांबळे, प्रशासकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय – पनवेल ३)श्रीमती कंगाली , औषध निर्माण अधिकारी ग्रामीण रुग्णालय चौक ता.खालापूर , यांनी भेट दिली असून , डॉ.निशिकांत पाटील, जिल्हा चिकित्सक रायगड – अलिबाग, हे सुद्धा उपोषणस्थळी भेट दिली . त्यांनी सर्व चौकशी करण्यास ७ दिवसांची मुदत मागितली मात्र रमेश दादा कदम यांनी त्यांची विनंती नाकारली आहे , जो पर्यंत कारवाई होत नाही तोवर हे उपोषण सुरूच रहाणार , हे सांगितले . 

       

यावेळी पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी सह कर्जत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील , बांधकाम सभापती महेंद्र चंदन , नगरसेवक प्रशांत पाटील , नगरसेवक राजाभाऊ कोठारी सर , कडू , चव्हाण , देशमुख त्याचप्रमाणे अनेक व्यापारी , नागरिक , कर्जतकर यांनी उपोषणस्थळी भेटी दिल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!