…….तरुणांचा बुलंद आवाज , वाढदिवस एका आक्रमक युवा नेत्याचा……
कर्जत तालुक्यातील शैक्षणिक - राजकीय क्षेत्रात - डॅशिंग संघटनेत पँथर ते आक्रमक नेतृत्व !

” शिवसेना कर्जत उप तालुका प्रमुख ” बॉबी शेठ वाघमारे……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यातील युवकांचा आवडता नेता , छत्रपती – फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीतील एक प्रसिद्ध नाव , गरीब परिस्थिती मधून प्रगती ची वाट काढत , समस्याग्रस्त – गोर गरिबांच्या अडचणी सोडवत , विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क देवून त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले त्यांचा ” बुलंद आवाज ” व या तरुण शक्तीच्या पाठिंब्याने आज कर्जत खालापूर मतदार संघाचे ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” व युवा नेतृत्व नगरसेवक ॲड. संकेत भासे यांच्या खास तालमीतील मर्जी सांभाळणारा एक युवा नेतृत्व , अनेक संघटनात्मक – राजकीय पदे सांभाळत ” पँथर ” पासून ” आक्रमक युवा नेतृत्व ” असा ” डॅशिंग प्रवास ” करून आक्रमक व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास आलेले ” बॉबी शेठ वाघमारे ” हे जिल्ह्यासहित कर्जत तालुक्यात आक्रमक नेतृत्व आहे .
लहानपणातच वडील दिवंगत मनोहर वाघमारे यांच्या ” लीडर शिप ” करण्याच्या राजकीय मुशीत घडलेले बॉबी शेठ ऐन तरुणपणीच राजकीय पटलावर आक्रमक भूमिका घेत मोर्चे – आंदोलने – पिडीत नागरिकांच्या , अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या समस्या घेवून शाळा , कॉलेज , शासकीय दरबारी जात व त्या सोडवत असत . पोलीस स्टेशनला जावून अनेकांची प्रकरणे , भांडणे होवू न देता मिटवली आहेत . शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचे भरीव काम असून अनेक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याने आज ही त्यांच्या पाठीशी ” युवा शक्ती ” असल्याने राजकीय पटलावर आज त्यांची ” शिवसेनेच्या उप तालुका प्रमुख ” पदाची जबाबदारी कर्जत खालापूर विधानसभेचे खंबीर नेतृत्व ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांनी दिली आहे . त्यांच्या ते खास मर्जीतील असल्याने वरिष्ठ पातळीवर देखील पक्षात त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते .
२८ फेब्रुवारी २०२६ आज त्यांचा वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा व भेटण्यासाठी रात्रीपासूनच कार्यकर्ते , युवा शक्ती व शैक्षणिक – राजकीय – धार्मिक – सामाजिक – सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व बहुजन वर्ग यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करत असून पुढील उदंड आयुष्याच्या ईश्वर चरणी प्रार्थना करत आहेत .



