Uncategorized

शिवसेना जिल्हाप्रमुख ” संतोष शेठ भोईर ” यांच्या मातोश्री ” ह.भ.प. राधाबाई भोईर ” यांचे वृद्धापकाळाने निधन !

संपूर्ण " तमनाथ " परिसरात शोककळा.....

दशकिया विधी २२ फेब्रुवारी रोजी तर उत्तरकार्य बुधवार ,२५ फेब्रुवारी रोजी तमनाथ येथे……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील तमनाथ येथे राहणारे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर तर त्यांचे बंधू भगवान शेठ भोईर , वसंत शेठ भोईर यांच्या मातोश्री ह.भ.प. राधाबाई मारुती ( पोपटशेठ ) भोईर यांचे शुक्रवार , दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. त्या ९० वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाने तमनाथ गावासह संपुर्ण कर्जत तालुक्यात शोककळा पसरली आहे .    

           राधाबाई भोईर या अत्यंत शांत व धार्मिक वृत्तीच्या होत्या . मनमिळावू स्वभावाच्या असल्याने घरी येणाऱ्या प्रत्येकाशी चहा – पाणी विचारून पाहुण्यांचे आदर स्वागत करायच्या . त्यांचे तिन्ही मुले राजकीय – सामाजिक – धार्मिक – शैक्षणिक – सांस्कृतिक – कला – क्रिडा , व्यापारी क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांचे घर मान्यवर , व्यापारी , उद्योजक , कार्यकर्ते , पदाधिकारी , ग्रामस्थांनी भरलेले असल्याने सर्वांनाच त्या प्रेमळ वागणूक देत भक्तिभावाचे दर्शन त्यांच्यात पहाण्यास मिळत असे . वारकरी संप्रदायामध्ये देखील राधाबाई सर्वांनाच परिचित होत्या . शांत आणि सेवाभावी स्वभावाच्या होत्या. गावात व परिसरात धार्मिक वातावरण रहावे , यासाठी त्यांची विशेष दृष्टी असे . 

           स्वर्गीय राधाबाई मारुती भोईर यांच्या अंत्यसंस्कारावेळी कर्जत तालुक्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर , ग्रामस्थ , त्यांचे नातेवाईक , आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे दशकिया विधी रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी तमनाथ येथे होणार असून उत्तरकार्य बुधवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी तमनाथ येथील त्यांच्या राहत्या घरी ” श्री छत्रपती बंगला ” येथे होणार आहे . यानिमित्ताने भजन – चक्री भजन – हरिपाठ – प्रवचन – किर्तन – अभंग वाणी कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे.

         स्वर्गीय राधाबाई यांचे भोईर कुटुंब व परिसरात तसेच पंचक्रोशीत खूप मोठा मान होता . त्यांच्या पश्चात पुत्र भगवानशेठ , वसंतशेठ , संतोषशेठ भोईर , पुतणे , बहिणी, सुना, नातवंडे , जावई असा मोठा परिवार आहे . या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!