Uncategorized

…..” शेकडो प्रवाश्यांना वाचवणारा तो ठरला खाकी वर्दीतला देवदूत “…..

पनवेल - कर्जत बसच्या " चालकाला " गाडी चालवताना आली चक्कर !

वाहक ” श्री. नितीन राजाराम मोरे ” चालक बनल्याने सर्वांनीच केले कौतुक , ” विकास दादा चित्ते ” यांनी दिली शाबासकीची थाप……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

” देव तारी त्याला कोण मारी ” अस म्हणतात ते अगदी खरे आहे . शेकडो प्रवाशांनी खचाखच भरलेली पनवेल – कर्जत बस आणि चालकाला चक्कर आली , तर त्या प्रवाशांचा जीव काय म्हटला असेल ? समोर अपघातच होणार हे निश्चित असताना एक ” देवदूत ” येवून सर्वांना वाचवतो , हे फिल्मी पिक्चर सारखा सीन नुकताच चौक – कर्जत रस्त्यावर घडला आहे . सर्वांचे दैव बलवत्तरच म्हणूनच वाहकच देवदूत बनून आला . 

         

ही घटना मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी घडली . संध्याकाळी साधारणपणे ६.३० वाजता पनवेल – कर्जत , बस नंबर MH20BL – 3628 हि पनवेल वरून निघाली . बस प्रवाशांनी खचाखच भरली होती . बस ७-१५ ते ७-२० ला चौक फाटा येथे आली असता अचानक पुढे जे प्रवासी उभे होते त्यांचे पैकी कुणीतरी अचानक आवाज दिला , अहो यांना ” चक्कर ” येते. या आवाजा बरोबरच गाडी देखील गचके खात पुढे जाऊ लागली . प्रवाशांमध्ये चलबिचल झाली . नक्की कळेना कोणाला चक्कर येते . त्यानंतर अहो , बसचे ” चालक ” यांना चक्कर येते , अशी माहिती पुढील प्रवाशांनी दिली. आवाज आला गाडी बाजूला घ्या . मागील प्रवाश्यांना काही समजेना , नक्की काय झाले ? काही क्षण आता काय होणार ? काय करायचे ? पण तेव्हढ्यात ताबडतोब एक व्यक्ती धावली. त्या बस चालकाला बाजूला बसवले , व स्वतः चालकाचे सिट वर बसून बस कर्जत पर्यंत अगदी सराईतपणे आणली. सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला व बस मधील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. तो चालक शेकडो प्रवाशांचा ” देवदूतच ” ठरला . 

          ती व्यक्ती म्हणजे त्या बसचे वाहक (कंडक्टर) होते. त्यांचे समय सुचकताचे सर्वांनीच कौतुक करुन प्रवाशी आपापल्या स्टाॅप वर उतरुन निघुन गेले. या गाडीत ” शिव शंभो युवा हायकर्स कर्जत संस्थेचे अध्यक्ष विकास दादा चित्ते होते ” , त्यांनी मात्र बस स्थानक पर्यंत जाऊन बस चालकांना दवाखान्यात घेऊन जाणेबाबत चौकशी केली. बस स्थानक अधिकारी यांना भेटून परिस्थिती सांगितली. वाहकाने केलेले अतुलनीय काम कानावर घातले . त्यानंतर वाहकाची भेट घेऊन धन्यवाद दिले. प्रसंगावधान दाखवून वाहकाने जे काम केले होते त्याचे कौतुक करत ” शाबासकीची थाप ” दिली . त्या देवदूताचे नाव ” श्री. नितीन राजाराम मोरे “.  तर चक्कर आलेल्या पनवेल – कर्जत ड्युटी बस चालकाचे नाव ” संदीप सोनावणे ” असे आहे . संदिप सोनावणे यांना दवाखान्यात घेऊन गेल्याचे फोन केला असता समजले की , उष्माघाता मुळे त्रास झाल्याचे कळाले , आता त्यांची तब्येत उत्तम आहे . म्हणूनच बस चालकांनी तब्बेत उत्तम राखून आपल्या आरोग्याची काळजी घेऊनच बस चालवावी , सर्व कंडक्टरांना ड्रायव्हिंग येतेच अस नव्हे , अशी चर्चा मात्र यानिमित्ताने होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!