…..” रक्तदाते राजाभाऊ कोठारी सरांच्या जिरेटोपात पुन्हा एकदा मानाचा तुरा “…..
" जप जीवाला बहुउद्देशीय संस्था टिटवाळा " यांनी केला पुरस्कार जाहीर !

राज्यस्तरीय ” जीवन गौरव रक्तदाता पुरस्कार – २०२६ ” ने सन्मानित…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
आपल्या जीवनाचे सर्वोच्च मानबिंदू म्हणून रक्तदान शिबिराला अतिशय महत्व देऊन अटकेपार कामगिरी करणारे कर्जत मधील सार्वजनिक रक्तदाते तथा महा रक्त वीर व नुकतेच नगरसेवक म्हणून म्हणून बहुमान मिळालेले कर्जत नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक राजाभाऊ कोठारी सर यांना नुकताच जप जीवाला बहुउद्देशीय संस्था ( रजि. ) यांच्या वतीने नुकताच ” राज्यस्तरीय जीवन गौरव रक्तदाता पुरस्कार – २०२६ ” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . हा पुरस्कार त्यांना रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वामी समर्थ प्रतिष्ठाण, मांडा, टिटवाळा (पूर्व) येथे देण्यात आला .
त्यांना सन्मानित करताना , राजेश मधुकांता शांतीलाल कोठारी हे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि समृद्ध ऐतिहासिक परंपरा लाभलेले बहुआयामी व्यक्तिमत्व – शांत – विनम्र – विश्वासू – जनसेवक – कर्मयोद्धा – संघर्षवादी – मितभाषी – प्रचंड उत्साही – लोकाभिमुख – सामाजिक कार्य करणारे – सर्वांच्या सुखदुःखात समरस होणारे स्पष्ट व निस्वार्थी वृत्ती, सतत हसतमुख चेहरा, सतत कार्यरत राहण्याचा स्वभाव, धार्मिक वृत्ती, अथक परिश्रम करण्याची वृत्ती जोपासणारे अशा अनेक पैलूंनी घडलेले बहुआयामी व्यक्तिमत्व मा. राजेश मधुकांत शांतीलाल कोठारी सर , आपले जीवन म्हणजे ज्ञान परायणाता लोकनिष्ठ परिवर्तनशीलता आणि उच्च ध्येयवाद आणि परमोच्य अविष्कारच म्हणावे लागेल . अशा या ” रत्नपारखीची ” गगनाला भिडलेली कर्तुत्वाची मशाल प्रेरणादायक स्फूर्तीदायक आणि दूरदृष्टी देणारी आहे.
मा. राजेश मधुकांत शांतीलाल कोठारी, यांना शिक्षण / समाजसेवा /पर्यावरण / धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात आपण केलेल्या अत्यंत महत्वपूर्ण, दीर्घकालीन आणि अतुलनिय सेवेबद्दल, सन्मानपूर्वक ” रक्तदाता जिवन गौरव पुरस्कार – २०२६ ” प्रदान करण्यात येत आहे. त्यांनी आपले आयुष्य समाजसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य करण्यासाठी समर्पित केले आहे. त्यांच्या या ” भरीव योगदानाचा गौरव ” म्हणून हे स्मृतिचिन्ह , मानपत्र देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
अफाट कर्तव्य प्रचंड ऊर्जेच्या जोरावर वाटेवर अनेक अडथळे ओलांडत आपण ध्येय गाठले, आपली कार्यशैली जिद्द, चिकाटी, अचूक आत्मविश्वास परिश्रम घेण्याची नवनिर्मिती , कौशल्य , आत्मविश्वास , सकारात्मक दृष्टिकोन , खरोखरच एका सामान्य कुटुंबातुन प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण कर्तुत्वाच्या आपल्या जीवनातील सर्वोच्च यशाच्या शिखरावर नावलौकीन आहात, आकाशाच्या विशाल प्रांगणात एखादा तेजस्वी तारा चमकावा व सा-या जनतेने त्यांच्याकडे कुतूहलाने पहावे आणि चकित व्हावें त्याचप्रमाणे आपण जनसेवेची निष्काम सेवा करीत आहात , हे आजच्या भावी युवा पिढीला प्रेरणा देणारे आहे. आपल्या कार्याच्या क्षमतेची इवलेसे रोप लाविलेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या ओळीचे स्मरण होते.
” कर्म ईक्ष पुजावा ” म्हणजे आपल्या सहकार्याची फुले ईश्वराला आवडतात. आपले आध्यात्मिक आणि समाजसेवा या क्षेत्रात कार्य अतुलनीय आहे. सर्व सामान्यांसाठी आपली तळमळ आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे.
समाजसेवा, प्रज्ञा, प्रसन्नता आणि प्रगल्भता या बरोबरच सामाजिक बांधिलकी अध्यात्मिक समाजसेवेचे व्रत आपल्या कार्याचा मुक्त कंठाने गौरव करावा म्हणून संस्थेचे वतीने आपणांस राज्यस्तीय ” रक्तदाता जिवन गौरव पुरस्कार -२०२६ ” प्रदान करीत आहोत.
या पुरस्कार सोहळ्या प्रसंगी एन. ए. कदम – संस्थापक अध्यक्ष जप जिवाला बहुद्देशीय संस्था , सौ. करुणा सचिन गगे- बांगर – उपाध्यक्षा , तुकाराम (नाना) सुरेखा दत्तात्रय मोंडकर , किसन गिरजाबाई परशुराम बोंद्रे – निवड समिती अध्यक्ष राष्ट्रीय समाजभुषण, समाजसेवक ठाणे त्याचप्रमाणे अनेक मान्यवर , महिला वर्ग , कर्जत तालुक्यातील मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी सर्वांनीच राजाभाऊ कोठारी सरांचे अभिनंदन करण्यात आले .




