…..” मातोश्री ” ह.भ.प. राधाबाई भोईर ” यांचे उत्तरकार्य पर्यंत भजन – कीर्तनाने झाले भक्तिमय वातावरण “……
संपूर्ण " तमनाथ " परिसर झाले पोरके.....

आईंच्या आठवणीने ” भगवान शेठ – वसंत शेठ – संतोष शेठ ” गहिवरले !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
” स्वामी तिन्ही जगाचा – आई विना भिकारी ” या ओळीत खूप काही दडले आहे . आई आपल्याला हे ” विश्व ” दाखवते , आपले दूध रुपी ” अमृत रस ” पाजून आपल्याला ” कवच कुंडले ” देते , आपले बोट धरून या जगात चालायला शिकवते , बोलायला धडे शिकवते , तरुणपणात काळजी करते , आपल्या विश्वात ती स्वतःची काळजी न करता वावरत असते , व अखेर वृद्धापकाळात ती सोडून जाते , शेवटी राहतात त्या आईच्या आठवणी . आपली मुले शेवट पर्यंत एकत्रित रहावे , गुण्या गोविंदाने रहावे , अशी शेवटपर्यंत इच्छा व्यक्त करणाऱ्या ” मातोश्री ह.भ.प. राधाबाई मारुती ( पोपटशेठ ) भोईर ” यांच्या वयाच्या ९० व्या वर्षी निधनाने कर्जत तालुक्यातील तमनाथ येथे राहणारे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर तर त्यांचे बंधू भगवान शेठ भोईर , वसंत शेठ भोईर ” पोरके ” झाले असून आईंच्या आठवणीने ” गहिवरत ” आहेत .
कर्जत तालुक्यातील तमनाथ येथे मातोश्री ह.भ.प. राधाबाई मारुती ( पोपटशेठ ) भोईर यांचे शुक्रवार , दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आज पर्यंत भजन – चक्री भजन – हरिपाठ – प्रवचन – किर्तन – अभंग वाणी असे भक्तिमय वातावरणात कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहेत . आज सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी देखील सायं. हरिपाठ – ६ ते ७ भैरवनाथ हरिपाठ महिला मंडळ नावंडे , तर भजन – रात्री ९ ते ११ – श्री कैलासबुवा कडव , रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ (रावगाव मुरबाड) यांचे होणार आहे .
या भोईर बंधूंच्या दुःखमय वातावरणात सांत्वन करण्यास ” श्री छत्रपती बंगला ” तमनाथ येथे राजकीय – सामाजिक – धार्मिक – शैक्षणिक – सांस्कृतिक – कला – क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी , व्यापारी वर्ग , उद्योजक , नागरिकांनी , मित्र आप्तेष्ट , नातेवाईक , माता – भगिनींनी भेटी दिल्या . यानिमित्ताने ” स्वर्गीय राधाबाई मारुती भोईर ” यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला .




