….. ” कशेळे येथे रस्त्यावरील खड्डा चुकविताना अपघात “…..
एम एस आर डी सी चे उपाध्यक्ष " अनिलकुमार गायकवाड " यांच्यावर संतापाची लाट !

सुदैवाने ” जीवितहानी ” टळली , मात्र ” १६ फेब्रुवारी ” रोजी ” आमरण उपोषणाचा ” इशारा……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
मनुष्य प्राणीचा ” जीव ” खूपच किंमती आहे . मात्र हा जीव कधी जाईल ? याचा भरोसा आता राहिला नाही . त्याचे कारण म्हणजे आपले कुटुंब चालविण्यासाठी व्यक्तीला घरा बाहेर कामानिमित्त जावे लागते , मात्र त्याला इच्छित स्थळी पोहचण्यासाठी ” रेल्वे ” तर कधी चार – दोन चाकी ” वाहनांचा ” वापर करावा लागतो . रेल्वे प्रवासात देखील जीवघेणी गर्दी असते तर वाहनांसाठी रस्ते देखील ” खड्डेमय ” असल्याने तिथेही अपघात होण्याची जास्त शक्यता असून याबाबतीत संबंधित अधिकारी वर्गांना सांगून देखील याची दखल घेतली जात नसल्याने अपघाताच्या घटना या होत रहात आहेत , म्हणूनच याविरोधात अश्या ” कामचुकार ” अधिकाऱ्यां विरोधात ” मनुष्य वधाचा ” गुन्हा व्हावा , अश्या कायद्याची आता गरज येवून ठेपली आहे .
कर्जत तालुक्यातील कशेळे गावा जवळ असलेल्या पेट्रोल पंपा शेजारी रस्त्यावरील खड्डा चुकवताना मोटारसायकल मध्ये आली असता, मागून येणाऱ्या चार चाकी ” टोयाटो ” गाडी चालकाने प्रसंगावधान दाखवून गाडी रस्त्याच्या खाली उतरविली. या वेळी मोटारसायकलला थोडासा धक्का लागून त्याच्या हाता पायाला किरकोळ दुखापत झाली. टोयाटो च्या सर्वच एअर बॅग उघडल्याने चालकाला देखील किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कर्जत – कशेळे – मुरबाड या नेहमीच वर्दळीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत , या करिता कशेळे ग्रामस्थांनी अनेक वेळा MSRDC अधिकारी यांना विनंती केली. व्यापारी संघटनेने उपोषणाचा ईशारा दिला. मागील महिन्यात सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील, पत्रकार दिनेश हरपूडे, राजू हरपूडे , सचिन राणे, विजय शिंदे यांनी MSRDC चे उपाध्यक्ष ” अनिलकुमार गायकवाड ” यांची भेट घेऊन सदर रस्ता त्वरित दुरुस्त करावा , अशी मागणी केली असता त्यांनी उपअभियंता ” अरुण देवकाते ” यांना त्वरित सूचना देऊन सदर रस्ता लवकर रिपेअर करा , अशी सूचना दिली होती . उपअभियंता अरुण देवकाते यांनी ” ठेकेदार ” पंधरा दिवसात रस्ता दुरुस्त करतील , असे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिले होते . याबाबत उदय पाटील यांनी सदर अधिकारी यांना अनेक वेळा फोन करून रस्ता दुरुस्तीची आठवण करून दिली. परंतु दोनच दिवसात काम सुरु करण्याचे आश्वासन देऊन हे अधिकारी वेळ मारून नेत आहेत.
आज सुदैवाने एक तरुण मुलाचा जीव वाचला , परंतु भविष्यात कोणाचा ” मृत्यू ” झाल्यावरच रस्ता दुरुस्त होणार का ? असा संतप्त सवाल कशेळे ग्रामस्थ करीत आहेत. सदर रस्ता १५ फेब्रुवारी पर्यंत दुरुस्त झाला नाही तर कशेळे ग्रामस्थ १६ फेब्रुवारी २०२६ रोजी आमरण उपोषण करतील , असा संतप्त इशारा कशेळे ग्रामस्थांनी ” कामचुकार अधिकारी ” उपअभियंता अरुण देवकाते यांना दिला आहे .




