…..” कर्जतमध्ये स्मॉल वंडर किड्स स्कूल चा अनिव्हल फंक्शन झाला जोरात “…..
चिमुकल्यांनी " नृत्य " करत दाखवले आपले कला कौशल्य !

पालकांच्या उपस्थितीत दहिवली ” माऊली सभागृहात ” रंगला कार्यक्रम…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जतमध्ये ” स्मॉल वंडर किड्स स्कूल ” चा ” अनिव्हल फंक्शन ” पालकांच्या व मान्यवरांच्या उपस्थित ” चिमुकल्यांच्या ” नृत्याने रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता हा कार्यक्रम माऊली सभागृह दहिवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला . यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी , पालक , मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते . या कार्यक्राची सुरुवात ” श्री गणेशा ” च्या गाण्याने झाली .
यावेळी झालेल्या कार्यक्रमात लहान मुलांचे डान्स , लुंगी डान्स, दिल है छोटासा, पापा पा मेरे पापा, लावणी, अश्या बहारदार गाण्यावर चिमुकल्यांनी छानसा डान्स केला , त्यानंतर पालकांनी सुद्धा आयोजित केलेल्या गेम ची मजा घेतली . कपल गेम , बिंदी स्टिक , महिलांकरिता संगीत खुर्ची , पुरुषांकरिता डिश पासिंग , तद् नंतर स्कूल मध्ये झालेल्या स्पोर्ट्स मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले . सन्मानचिन्ह व सन्मानपत्र मान्यवर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर पंचू अण्णा गायकवाड , दैनिक वृत्तपत्र बेधडक महाराष्ट चे उप संपादक संकेतजी घेवारे , स्कूल चे ट्रस्टी तुषार बनसोडे आणि तथागत तुषार बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आले . पालकांच्या खेळात यशस्वी झालेल्यांना बक्षीस म्हणून सन्मान ट्रॉफी देण्यात आली .
याप्रसंगी स्कूल आणि टीचर स्टाफ चे पालकांनी स्वतः चे मनोगत व्यक्त केले . त्यांनी स्कूलच्या प्रिन्सिपल , सर्व टीचर यांचे कौतुक केले . स्कूलच्या प्रिन्सिपल रोहिणी तुषार बनसोडे मॅडम यांच्या हस्ते स्कूल टीचर स्टाफ आयशा टीचर , पवार टीचर , अंजली टीचर , मीनाक्षी टीचर , कशीश टीचर , यांना फुल गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाचा शेवट ” राष्ट्रीय गीत ” गाऊन कार्यक्रम संपवण्यात आला . यावेळी सर्वांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती .




