….” कर्जत तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीची जोरदार मुसंडी “…..
जिल्हा परिषद ६ - ० व पंचायत समिती निवडणुकीत १२ - १० जागा जिंकत महायुतीचा दारुण पराभव !

” सुधाकर भाऊ घारे व नितीन दादा सावंत ” यांचे यशस्वी डावपेच…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख ” नितीन दादा सावंत ” यांनी विजयाची जोरदार ” मुसंडी ” घेत एकतर्फी गुलाल उधळला असून यांत महायुतीचा सपशेल ” धुव्वा ” उडवला आहे . जिल्हा परिषदेच्या ६ – ० व पंचायत समितीच्या १२ – १० अश्या जागा जिंकून आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे वर्चस्व कमी केले आहे .
या निवडणुकीत कळंब – जिल्हा परिषद –
१) नारायण डामसे ( राष्ट्रवादी ), एकुण मते – 11083 (234 मतांनी विजयी)२) हरिश्चंद्र निरगुडा , एकुण मते – 10849 , ३) Nota – 437
पोशिर – पंचायत समिती १) हर्षला बेहले , एकुण मते – 4833 , २) रेश्मा जोशी ( शेकाप ) , एकुण मते – 5857 (974 मतांनी विजयी)३) Nota – 197
कळंब – पंचायत समिती १) कविताबाई शिंगवा (ठाकरे सेना ), एकुण मते – 6475 (1747 मतांनी विजयी)२) निलम ढोले , एकुण मते – 4728 , ३) Nota – 307
कशेळे – जिल्हा परिषद १) वर्षा सुरेश दोरे ( राष्ट्रवादी ), एकुण मते – 12752 (3719 मतांनी विजयी)२)प्रमिला भरत शिद एकुण मते – 9033 , ३) Nota – 382
पाथरज – पंचायत समिती १) कविता भरत पादिर ( राष्ट्रवादी ), एकुण मते- 6836 (1971 मतांनी विजयी) , २) अश्विनी कांता पादिर एकुण मते- 4865, ३) Nota – 251
कशेळे – पंचायत समिती १) अक्षय राम तिटकारे ( राष्ट्रवादी ) एकुण मते – 5689 (1419 मतांनी विजयी) ,२) सचिन बाळकृष्ण भोईर एकुण मते – 4270 , ३)Nota – 109
नेरळ – जिल्हा परिषद १) सुनिता सुरेश टोकरे एकुण मते – 9864 , २) सुनिता रोहिदास मोरे ( ठाकरे सेना ) एकुण मते – 10747 (883 मतांनी विजयी) , ३) Nota – 503
नेरळ – पंचायत समिती १) असिफ अत्तार एकुण मते – 357 , २) नम्रता कांदळगावकर एकुण मते – 3627 , ३) भगवान चंचे ( राष्ट्रवादी ) एकुण मते – 6995 (3368 मतांनी विजयी) , ४) उषा कृष्णा पारधी एकुण मते – 136 , ५) Nota – 199
दामत – पंचायत समिती १) महेश खारीक ( राष्ट्रवादी ) एकुण मते – 4703 (1190 मतांनी विजयी) , २) नरेश मसणे एकुण मते – 3513 , ३) सुमित साबळे एकुण मते – 1487 , ४) Nota – 93
कडाव – जिल्हा परिषद १) योगेश कांबेरे एकुण मते – 9323 , २) मारुती ( बाबू ) घारे ( ठाकरे सेना ) एकुण मते – 11278 (1955 मतांनी विजयी) , ३) Nota -164
वाकस – पंचायत समिती १) अमोल जाधव एकुण मते – 4484 , २) नितिन धुळे ( राष्ट्रवादी ) एकुण मते – 5498 (1014 मतांनी विजयी), ३) Nota – 225
कडाव – पंचायत समिती १) सुषमा चेतन पवाळी ( ठाकरे सेना ) एकुण मते – 5656 (699 मतांनी विजयी) , २) संध्या सुदाम पवाळी एकुण 4957 , ३) Nota – 220
माणगाव तर्फे वरेडी – जिल्हा परिषद १) राधिका किशोर ठाकरे एकुण मते – 5078 , २) सुवर्णा प्रदीप ठाकरे ( राष्ट्रवादी ) एकुण मते – 8714 (19 मतांनी विजयी) , ३) रेश्मा योगेश मिसाळ – 8695 , ४) Nota – 196
माणगाव तर्फे वरेडी – पंचायत समिती १) महेश सुरेश विरले ( शिवसेना शिंदे गट ) एकुण मते – 5980 (178 मतांनी विजयी) , २) संदेश रमेश हजारे एकुण मते – 5802 , ३) Nota – 200
उक्रुळ – पंचायत समिती १) प्रियंका जितेंद्र पाटील एकुण मते – 2770 , २) सुप्रिया राजेश भगत एकुण मते – 2672 , ३) नमिता लहु श्रीखंडे ( राष्ट्रवादी ) एकुण मते – 5519 (2749 मतांनी विजयी) , ४) Nota – 218
मोठे वेणगाव – जिल्हा परिषद १) उषा अंकुश ठोंबरे ( राष्ट्रवादी ) एकुण मते – 13142 (5547 मतांनी विजयी) , २) संगिता वसंत वाघमारे एकुण मते – 7595 , ३) Nota – 268
मोठे वेणगाव – पंचायत समिती १) चित्रा जगदीश ठाकरे ( ठाकरे सेना ) एकुण मते – 5108 (617 मतांनी विजयी) , २) श्वेता प्रसाद थोरवे एकुण मते – 4491 , ३) Nota – 177
बीड बुद्रुक – पंचायत समिती १) नमिता सुधाकर घारे ( राष्ट्रवादी ) एकुण मते – 7970 (4508 मतांनी विजयी) , २) सोयराबाई प्रमोद सुर्वे एकुण मते – 3462 , ३) Nota – 186 . असा अंतिम निकाल लागला आहे .
यावेळी प्रशासकीय भवन बाहेर विजयी जल्लोषात हा विजयी ” स्वर्गीय अजित दादा पवार ” यांना समर्पित केल्याचे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी व्यक्त केले , तर कर्जत तालुक्यातील सर्व परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच मतदार बंधू भगिनींचे मनपूर्वक आभार उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी मानले.




