Uncategorized
…. ” कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची यंत्रणा एक्शन मोडवर “…..
निवडणूक निर्णायक अधिकारी तथा प्रांत अधिकारी " प्रकाश संकपाळ " यांची माहिती !

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात तब्बल २ वर्षे उशिरा होत असलेल्या दिनांक ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रिया निमित्ताने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची सर्व प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून उद्या दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या इच्छित स्थळी रवाना होणार आहेत . तर सोबत सर्व ईव्हीएम मशीन व निवडणुकीची सर्व सामुग्री घेऊन पोलीस यंत्रणेसहित मतदान केंद्राकडे जाणार आहे , अशी माहिती निवडणूक निर्णायक अधिकारी तथा प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी प्रसार माध्यमाना दिली आहे .



