Uncategorized

…..” कर्जत प्रशासकीय भवनात अनेक सोई सवलतींचा अभाव “…..

बहुजन समाज पार्टीचे कर्जत तहसीलदार " धनंजय जाधव " यांना निवेदन !

मागण्या मान्य न झाल्यास करणार तीव्र आंदोलन , ” जिल्हाध्यक्ष जीतरत्न जाधव ” यांचा संतप्त इशारा…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील जनतेला अनेक वर्षे संघर्ष करून डोंगरावर असलेले तहसील कार्यालय २ वर्षापूर्वी कर्जत शहरात आणून नागरिकांचा त्रास कमी झाला व भव्य प्रशासकीय भवन उभे राहून तेथून तालुक्याचा कारभार होत असताना या भव्य प्रशासकीय भवनात मात्र अनेक सोई सुविधांचा अभाव येथे पहाण्यास मिळत आहे . याविरोधात अनेकांनी वारंवार सूचना करूनही त्यात सुधारणा होत नसल्याने बहुजन समाज पार्टीने हे ” हक्क आणि अधिकार ” मिळण्यासाठी ” दंड थोपटून ” उभे राहिले असून या सुविधा त्वरित न मिळाल्यास याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा संतप्त इशारा बी एस पी चे जिल्हाध्यक्ष ” जीतरत्न जाधव ” यांनी आज मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी कर्जत तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे . 

     

यावेळी दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या त्यांनी केल्या आहेत . १) तालुक्यातून येणाऱ्या दिव्यांग व वरिष्ठ नागरिक यांच्या करिता वरील मजल्यावर येण्या जाण्याकरिता लिफ्ट व रॅम ची व्यवस्था करावी किंवा संजय गांधी शाखा व पुरवठा शाखा तसेच आधार कार्ड केंद्र तळमजल्यावर स्थलांतर करण्यात यावे . २) दिव्यांग, विधवा, परीतक्त्या, घटस्फोटीत, दुर्धर आजार, तृतीयपंथी, वयोवृद्ध नागरिक यांचा संजय गांधी योजनेचा लाभ तसेच अंत्योदय अन्नधान्य योजनेचा लाभ अनुसूचित जाती, जमातीच्या व गरीब श्रमजीवी मजूर वर्गाच्या वाडी – वस्ती – नगरात , जाऊन शोध घेऊन किंवा त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज प्रमाणे तात्काळ संजय गांधी व अंत्योदय अन्नधान्य योजनेचा लाभ देण्यात यावा . ३) प्रत्येक महिन्याच्या पाच तारखे पर्यंत तालुक्यातील राशन कार्ड धारकांना अन्नधान्य राशन दुकानावर उपलब्ध करून द्यावे . ४) माथेरान हे नगरपालिका क्षेत्रामध्ये येत असल्याने माथेरान येथे एफसीआय येथून थेट अन्नधान्याची वाहतूक रेशन दुकानात पोहोच मिळावी . ५) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी .६) हिरकणी कक्ष येथे फक्त महिलां व लहान बालकांसाठी प्रवेश असल्याने कक्षामध्ये किंवा कक्षाच्या एक मीटर बाहेरील अंतरावर कुठलाही परिस्थितीत पुरुष जाणार नाही , याची दक्षता घ्यावी. ७) 

टेकडीवरील जुन्या तहसील कार्यालय मध्ये असलेले सर्व अभिलेख नवीन प्रशासकीय भवन येथे आणावेत व प्रशासकीय भवन येथे अस्ताव्यस्त असलेले अभिलेख हे जुन्या तहसील कार्यालयात ठेवण्यात आलेल्या मोठ्या कपाटा प्रमाणे सुरक्षित अभिलेख ठेवावे . ८) सर्व तलाठी कार्यालय व मंडल अधिकारी कार्यालय त्यांच्या सजेत कार्यक्षेत्रातच असावे . ९) प्रशासकीय भवन येथे स्वस्त , स्वच्छ , सकस , आरोग्यदायी आहार मिळण्याकरिता उपहारगृह सुरू करावे.

१०) प्रशासकीय भवन येथे चारही दिशेने रस्त्याची व्यवस्था करणे. ११) तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय येथील सर्व खाजगी कर्मचारी यांचा भवितव्याचा विचार करून त्यांना कायमस्वरूपी शासन सेवेत समावेश करून घ्यावे किंवा किमान दरमहा वेतन चाळीस हजार व शासकीय कर्मचारी प्रमाणे खाजगी कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना शासनाच्या सर्व सुविधा मिळाव्यात. 

     

सदर मुद्द्यांचे असलेल्या समस्या तात्काळ सोडवण्यात याव्यात अन्यथा या गंभीर प्रश्नांविरोधात बहुजन समाज पार्टी रायगड जिल्हा , कर्जत तालुक्याच्या वतीने संविधानिक पद्धतीने संतप्त आंदोलन उभारू , असा इशारा जिल्हाध्यक्ष जीतरत्न जाधव यांनी कर्जत तहसीलदार धनंजय जाधव यांना दिला आहे , तर या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी , रायगड – अलिबाग , उपविभागीय अधिकारी कर्जत उपविभाग कर्जत , जिल्हा पुरवठा अधिकारी , रायगड अलिबाग , 

मा. अधीक्षक , माथेरान अधीक्षक कार्यालय माथेरान. या सर्वांना निवेदन देण्यात आले आहेत . यावेळी कर्जत तालुका व शहर पदाधिकारी उपस्थित होते . आता यावर कर्जत तहसीलदार काय भूमिका घेतात , याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!