Uncategorized

…..” केबल न टाकल्याने अनेक महिने होऊनही महावीर पेठेतील ट्रान्सफॉर्मर बंद अवस्थेत “…..

संतप्त " नगरसेवकांसहित नागरिकांचे " वीज कंपनीला निवेदन सादर !

कर्जत वीज कंपनीचे ” बुजगावणे ” उप कार्यकारी अभियंता ” चंद्रकांत केंद्रे ” यांचे दुर्लक्ष ! 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

आजच्या या ” आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या ” युगात ” विजेला ” अनन्य साधारण महत्व आहे . मात्र हि वीज सेवा पुरवणारे कार्यालयातील ” बुजगावणारे ” अधिकारी ” कर्तव्यात कसूर ” करून नागरिकांना त्रास कसा होईल , याकडे लक्ष देत असल्याचे चित्र कर्जत नगर परिषद हद्दीत दिसून येत आहे . त्यामुळे लोकप्रतिनिधी व नागरिक संतप्त होत कर्जत वीज कंपनी कार्यालयाचे दरवाजे ठोठावत याचा जाब विचारत आहेत . 

          कर्जत नगर परिषद हद्दीतील ” महावीर पेठ ” प्रभागात अनेक महिने नव्याने जादा क्षमतेचे ” ट्रान्सफॉर्मर ” बसविले आहे . परंतु अद्यापपर्यंत त्याला वीज केबल जोडली नसल्याने , जुन्या ट्रान्सफॉर्मरने कमी दाबाने वीज पुरवठा नागरिकांना होत आहे . हि कामे ठेकेदारा मार्फत वीज कंपनी करत असते , मात्र या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांचे हात ” कमिशनच्या लाल मलाईत ” अडकलेले असल्याने हे अधिकारी अश्या ठेकेदारांवर दबाव तंत्राचा वापर करत नाहीत . त्यामुळे ” शेफारलेल्या ” या ठेकेदारांवर कुणाचाच अंकुश नसल्याने नाहक नागरिकांना याचा त्रास होत असून नुकसानीला व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे . 

          म्हणूनच संतप्त झालेले नागरिक , नगरसेवक वीज कंपनीच्या कार्यालयात याचा जाब विचारण्यासाठी जाऊन ताबडतोब वाढीव केबल टाकण्यासाठी निवेदन देऊन कर्जत वीज कंपनीचे ” बुजगावणे ” उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे यांना जाब विचारला . असे कर्तव्यदक्ष नसलेले अधिकाऱ्यांची कर्जतमध्ये गरज नसून अशांची येथून हकालपट्टी व्हावी , असा संतप्त सूर त्रस्त नागरिकांतून उमटत आहे. 

           यावेळी निवेदन देताना कर्जत नगरपरिषदेचे नगरसेवक राजाभाऊ कोठारी सर , गटनेते तथा बांधकाम सभापती महेंद्र चंदन, नगरसेवक प्रशांत पाटील , परेशभाई शाह व जयवंत म्हसे यांनी कर्जत महावितरणचे चंद्रकात केंद्रे यांना प्रत्यक्ष भेटून लेखी पत्र देउन चर्चा केली . त्यांनी दोन- तीन दिवसात काम करतो असे , ” उपकारात्मक ” आश्वासित केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!