Uncategorized

…..” काळभैरव माध्यमिक विद्यालय किरवली शाळेत इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद सोहळा संपन्न “…..

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवीन सिलिंग केलेल्या वर्ग खोल्यांचे उदघाटन !

संस्थेचे अध्यक्ष तथा खोपोलीचे मा. नगराध्यक्ष ” रामदासजी शेंडे साहेब ” यांची उपस्थिती…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

गतवर्षी अतिशय ” स्वच्छ व सुंदर ” शाळेची गणना माननीय ” मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर अभियानात ” कर्जत तालुक्यात ” पहिला क्रमांक ” पटकावून सुमारे ” तीन लाखांचे ” पारतोषिक जिंकलेल्या ” काळभैरव माध्यमिक विद्यालय किरवली ” शाळेत इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा ” आशीर्वाद सोहळा ” अर्थात ” शुभेच्छा ” देणारा कार्यक्रम सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला . याप्रसंगी श्री भैरवी विद्या विकास ट्रस्टचे संस्थापक / अध्यक्ष तथा खोपोली नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष मान. ” रामदासजी शेंडे ” साहेब यांच्या समवेत संदीप शेठ भोईर , हर्षद सावंत , निलेश सोनी , शरद बडेकर , योगेश बडेकर , संदीप ठाकरे , विश्वनाथ बडेकर , नरेश बडेकर , सावळाराम बडेकर , पोलीस पाटील विवेक बडेकर , डॉक्टर राज बडेकर , तानाजी बडेकर , गजानन थोरवे , दत्ता भोईर , संजय देशमुख सर , पानपाटील सर , नैतिक शिंदे , मनोज करताडे , प्रियंका हरवंदे , वैशाली पाटील व पंचक्रोशीतील महिला , ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते . 

         

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवीन सिलिंग केलेल्या वर्ग खोल्यांचे उदघाटन करण्यात आले. अतिशय ” संगीतमय व रंगतदार ” कार्यक्रमात अशोक थोरवे यांनी शाळेवर आधारित कविता सादर केली. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी ऋणानुबंध व्यक्त केले. अनेक मान्यवरांनी परीक्षेत उत्तम यश मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न कसे करावेत ? याविषयी मार्गदर्शन केले . हर्षद शेठ सावंत यांच्या मदतीने शाळेच्या वर्ग खोल्यांना सिलिंग करून देण्यात आले तर स्नेह भोजनाची व्यवस्था योगेश शेठ बडेकर व किसन शेठ बडेकर यांच्या वतीने करण्यात आली होती . डॉक्टर राज बडेकर यांनी सर्व मुलांना एक गिफ्ट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमच्या शेवटी सर्वांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

         

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बोराडे सर , सूर्यवंशी सर , ठोकळे सर , देशमुख सर , तुषार मिसाळ सर , म्हसे सर , पाटील मॅडम , यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

किरवली मधील या हायस्कूल मध्ये वर्षभर विविध कार्यक्रम व विविध उपक्रम धूम धडाक्यात साजरे होतात त्यामुळे नेहमीच या शाळेचे तालुक्यात सर्वत्र कौतुक पहावयास मिळते. सदर शाळा अतिशय स्वच्छ व सुंदर असून शाळेत सोलर सिस्टम, मोठा हॉल , ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा , इलर्निंग , संगणक कक्ष , रेन्हार्वेशटिंग सुविधा उपलब्ध आहेत , त्यामुळे या शाळेत उत्साही वातावरणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत , व चमकदार कामगिरी करून रायगड जिल्ह्यात नाव पटकावत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!