Uncategorized

…..” जुने एस.टी. स्टॅन्ड , भिसेगांव – गुंडगे रोड , कर्जत येथे शिवजयंती उत्साहात साजरी “…..

" डॉ. बाबासाहेब आंबेडकर " जयंती उत्सव मंडळाचा पुढाकार !

” छावा ” चित्रपट दाखवून तरुणांच्या मनात पेरले ” स्वाभिमानाचे आणि देशसेवेचे ” धडे…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

” बहुजन हिताय – बहुजन सुखाय ” हा नारा घेऊन गेली अनेक वर्षे जुने एस टी स्टँड, भिसेगाव – गुंडगे रोड परिसरात सामाजिक उपक्रम व महापुरुषांच्या तसेच महा मातांच्या जयंती साजरी करून बहुजन जनतेच्या मनात ” छत्रपती – फुले – शाहू – आंबेडकरी ” विचारधारा पेरण्याचे महान कार्य ज्येष्ठ आंबेडकरी अनुयायी तथा रेल्वेचे रिटायर्ड गार्ड आयु. ” सुनील बाबा चव्हाण साहेब ” हे ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या ” पुढाकाराने सातत्याने करत आहेत . यावेळी देखील महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या १९ फेब्रुवारी २०२६ ” शिवजयंती ” मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . 

          यावेळी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अर्धाकृती पुतळ्यास सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन उपस्थित सर्वांनीच केले . याप्रसंगी कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे , नगरसेवक अशोक दादा राऊत , महिला व बाल कल्याण सभापती हर्षाली गायकवाड , माजी नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव , सौ. चव्हाण काकी , बहुजन समाज पार्टीचे कर्जत शहर अध्यक्ष सचिन चव्हाण , विजय शेठ पाल , रॉली पाल , गायक भारत पवार , एस आर पी कर्जत शहर अध्यक्ष सुभाष सोनावणे , अनिल जाधव , व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी , त्याचप्रमाणे जुने एस टी स्टँड गुंडगे रोड परिसरातील अनेकांनी , महिला वर्गाने ” छत्रपतींच्या पराक्रमी विचारांना ” अभिवादन केले . 

        यावेळी रात्री छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर शौर्य पराक्रमाचा ” छावा ” चित्रपट पडद्यावर दाखवून तरुणांच्या मनात ” स्वाभिमानाचे व देशसेवेचे ” धडे पेरले . व १९ फेब्रुवारी २०२६ ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ” सुनील बाबा चव्हाण ” यांनी दिल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!