Uncategorized

……” भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या ” असहकार आंदोलनास ” कर्जत तालुका आर पी आय पक्षाचा जाहीर पाठिंबा “……

कर्मचारी संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करण्याची केली मागणी !

कर्जत तालुका अध्यक्ष ” हिरामण भाई गायकवाड ” यांनी दिले ” उप अधिक्षक नितीन अटोळे ” यांना पाठिंबा पत्र…… 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

अन्यायावर मात करून योग्य मार्ग काढण्याच्या कुशल कार्यामुळे राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे काम राष्ट्रीय अध्यक्ष ” रामदासजी आठवले साहेब ” यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र सुरू आहे . त्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यात पक्षाचे कार्य करताना तालुका अध्यक्ष ” हिरामण भाई गायकवाड ” देखील त्याच जोमाने ” अन्यायावर प्रतिकार ” करून सर्वांना न्याय देत आहेत . नुकतेच कर्जत भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचारी संघटनेने ” असहकार आंदोलन ” पुकारलेले आहे . त्यांच्या संविधानिक मागण्या पूर्ण होण्यासाठी आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष ” हिरामण भाई गायकवाड ” यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी यांनी या असहकार आंदोलनास जाहीर पाठिंबा दर्शविला आहे . तसे पाठिंब्याचे पत्र बुधवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी ” उप अधीक्षक नितीन अटोळे ” यांना त्यांच्या कार्यालयात दिले . 

            भूमि अभिलेख कर्मचारी कृती समिती [ महाराष्ट्र राज्य ] यांचे वतीने बुधवार दि. १८ फेब्रुवारी ते सोमवार दि. ०२ मार्च २०२६ पर्यंत संघटनेच्या कर्मचारी वर्गाने ” असहकार आंदोलन ” छेडले आहे . रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कर्जत तालुक्याच्या वतीने या कर्मचारी बंधूच्या न्याय हक्काच्या संविधानिक मागण्यासाठी जनहितार्थ असहकार आंदोलनाच्या आम्ही सोबत आहोत . तसेच या आंदोलनातील उपरोक्त मागण्या मान्य न झाल्यास ०२ मार्च नंतर ” बेमुदत कामबंद आंदोलन ” झाल्यास या बेमुदत आंदोलनास देखील रिपाइं (आ) या राजकीय पक्षाच्या वतीने आपले ” न्याय – हक्क – अधिकार – मागणीस आमचा नैतिक पाठींबा असल्याचे आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी म्हटले आहे . 

         कर्जत तालुक्यात या ” असहकार आंदोलनामुळे ” व पुढे मागण्या मान्य न झाल्यास ” बेमुदत काम बंद आंदोलनामुळे ” नागरिकांच्या होणाऱ्या कामाची दिरंगाई बघता राज्य शासनाने भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात , अशी मागणी देखील आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष ” हिरामण भाई गायकवाड ” यांनी शासनाकडे केली आहे . सदरचे पाठिंबा पत्र देताना अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या सोबत कर्जत तालुका आर पी आय पक्ष प्रवक्ते प्रेमनाथ जाधव हे देखील बरोबर होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!