…..” भिसेगाव येथे श्री वेताळ देवाचा उत्सव – २०२६ मोठ्या उत्साहात साजरा “…..
" अमृतमय सोहळ्यास " हजारोंच्या संख्येने भक्तांची गर्दी !

देवस्थान कमिटीच्या वतीने केला ” मान्यवर व नगराध्यक्षा – नगरसेवकांचा ” सत्कार……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव डोंगरावर असलेले ग्रामस्थांचे दैवत ” श्री वेताळ देवस्थानचा ” उत्सव माघ पौर्णिमे निमित्त रविवारी दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात हजारोंच्या संख्येने दर्शनास आलेल्या मान्यवर , नगरसेवकांच्या उपस्थित साजरा झाला . यावेळी भाविकांनी महाभोजनाचा प्रसाद घेत उपस्थिती दर्शवली .
याप्रसंगी ” श्री वेताळ देवाचा ” अभिषेक करण्यात आला . भिसेगाव येथे पश्चिम दिशेला असणाऱ्या डोंगरावर ” पूर्वापार – स्वयंभू ” असलेले हे देवस्थान ” कडक ” असून हा देव ” पावणारा ” असल्याने दर ” अमावास्या व पौर्णिमला ” दर्शन घेण्यासाठी येथे भाविक येत असतात . पंचक्रोशीतील भाविकांचे रक्षण करणारे हे देवस्थान असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे . हा उत्सव साजरा होताना नवनाथ भजनी मंडळ – भिसेगांव ” यांचे जागरण भजन , जलाभिषेक, मंत्रजप , आरती , अभिषेक , महाआरती , महाप्रसाद (जेवण) असा सकाळपासून – रात्रीपर्यंत कार्यक्रम झाला .या उत्सवासाठी अनेक भक्तांनी महाप्रसाद व इतर कार्यासाठी देणगी व वस्तू रुपी सढळ हस्ते मदत करून सहकार्य केले .

या उत्सवास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत , नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे , उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील , माजी नगराध्यक्षा तथा नवनिर्वाचित नगरसेविका सौ. सुवर्णा जोशी , नगरसेवक महेंद्र चंदन , नगरसेविका हर्षाली गायकवाड , नगरसेविका मानसी कानिटकर , नगरसेवक अशोक दादा राऊत , नगरसेविका अंजली कडू , नगरसेविका नेहा शिंदे , नगरसेवक विजय भाऊ हजारे , नगरसेवक प्रशांत पाटील , तर अतुल कडू , महेंद्र कानिटकर , यांचा माजी नगरसेवक सोमनाथ आप्पा ठोंबरे , माजी नगरसेवक पुंडलीक शेठ भोईर , चंदू राऊत , राजेंद्र बोराडे सर , प्रेमनाथ गोसावी सर , दिसले , पोलीस पाटील संजय हजारे व भिसेगाव महिला मंडळ यांच्या शुभ हस्ते शाल – श्रीफळ – पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला . या उत्सवास परिसरातील सर्व ग्रामस्थांनी, भाविकांनी , कर्जतकर नागरिकांनी , महिला वर्गांनी या ” अमृतमय सोहळ्यास ” सहभागी होऊन या सोहळ्याचा, दर्शन कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला .





