Uncategorized

……” अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम “……

कर्जत तालुक्यातील " गुढवणवाडी शाळेच्या " दोन खोल्या बांधून केले " देशव्यापी " कार्य !

माजी नगराध्यक्षा ” सौ. सुवर्णा जोशी ” यांचे विशेष प्रयत्नाने लोकार्पण सोहळा संपन्न……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील गुढवणवाडी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कित्येक वर्ष दोन खोल्यांमध्ये १ ली ते ७ वी इयत्तेतील ८० – ८५ विद्यार्थी शिक्षण घेत होते . अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीच्या सी एस आर फंड मधून शैक्षणिक साहित्य वाटपास आलेल्या सौ. गौरी साठे आणि कर्जत नगर परिषदेच्या मा. नगराध्यक्षा तथा ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सौ.सुवर्णा जोशी यांच्याकडे तत्कालीन मुख्याध्यापक राजेंद्र कोळी सर आणि त्यांचे सहकारी यांनी वर्ग खोल्यांची मागणी केली होती. त्यानंतर ज्ञानेश्वर वाडीले, श्रीकृष्ण सुपे, पंढरीनाथ पाटील , घुले सर, व ग्रामस्थ या सर्वांनी वेळोवेळी माजी नगराध्यक्ष सौ.सुवर्णा जोशी यांच्याकडे पाठपुरावा केला असता, अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी सी एस आर फंड मधून दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण करून देण्यात त्यांना यश आले आहे. या अविस्मरणीय सोहळ्याची व गुढवणवाडीतील ग्रामस्थांची स्वप्नपूर्ती आज दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन वर्ग खोल्यांचा लोकार्पण सोहळा अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी चे संस्थापक श्री अवधूत साठे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

गुढवण वाडीतील अबाल वृद्ध , ग्रामस्थ यावेळी स्वागतासाठी आणि या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. महिला वर्गाने रांगोळ्या काढल्या, मान्यवरांचे औक्षण केले. सदर कार्यक्रमास श्री. अनंत खैरे, गटशिक्षणाधिकारी कर्जत, श्री. अरुण पारधी , विस्तार अधिकारी कर्जत, प. शि. , म्हात्रे विस्ताराधिकारी कळंब , दिलीप घुले मुख्याध्यापक, श्रीकृष्ण सुपे ज्ञानेश्वर वाडीले, पंढरीनाथ पाटील, अर्जुन सपकाळ, शंकर फोडसे, संतोष मगर , कशेळे केंद्रातील सर्व शिक्षक वृंद , शाळेचे माजी शिक्षक, दिनेश खडे , व विद्यार्थी मित्र मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनीच श्री. अवधूत साठे , सौ. गौरी साठे व सौ. सुवर्णा केतन जोशी, अभिजीत शिर्के, संदीप भोईर यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

अतिशय दिमाखदार असा हा सोहळा आणि सर्वांनी उत्साहाने त्याच्यात भाग घेतला होता. सदर उपक्रमाबाबत सर्वत्र अवधूत ट्रेडिंग अकॅडमी चे कौतुक होत आहे , तर सौ. सुवर्णा जोशी यांच्या पुढाकाराने या विद्यार्थ्यांच्या शिक्षण सेवेत दोन रूम होत असल्याने त्यांचे देखील अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!