Uncategorized

शिवसेना संघटक ” नदीम भाई खान ” यांचा कर्जतकरांना नव वर्षाच्या दिवशी स्वच्छतेचा संदेश !

....." आपला कचरा - आपली जबाबदारी ".....

भगवान ” महावीर मंदिर ते दर्गाह ” रस्त्याचे पावित्र्य राखा , केले आवाहन…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषद हद्दीत असलेली निसर्ग रम्य ” उल्हास नदी ” व त्या नदी लगत असलेल्या रस्त्यावर भगवान महावीर यांचे भव्य मंदिर , श्री शनी मंदिर , व मुस्लिम समाज बांधवांचे इसुब शाह बाबा यांचा जागृत दर्गाह , तर जीवनाच्या प्रवासाचे अंतिम स्थळ मुस्लिम स्मशान भूमी या पवित्र स्थानाचे ” पावित्र्य ” राखून या रस्त्यावर व परिसरात कर्जतकर नागरिकांनी कचरा टाकू नका , असा नारा देत या रस्त्यावरील परिसराची नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वच्छता मोहीम आखून ” आपला कचरा – आपली जबाबदारी ” असा संदेश शिवसेना शिंदे गटाचा मावळा तथा शिव भक्त , कर्जत शहर संघटक नदीम भाई खान यांनी दिला आहे . नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारीला दरवर्षी नवनवीन ” संकल्प ” करून शिवसेना कर्जत शहर संघटक नदीम भाई खान कर्जतकर नागरिकांना आपल्या कृतीतून संदेश देत असतात . यावेळी त्यांनी उल्हास नदी तीरावर असलेली कचरायुक्त अस्वच्छता स्वखर्चाने जे सी बी लावून परिसर स्वच्छ केला .

शिवसेना कर्जत शहर संघटक – शिव भक्त नदीम भाई युसुफ खान हे समाज कार्याला वाहून घेतलेले ” अलौकिक नेतृत्व ” आहे . शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ” ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ” हा महामंत्र प्रत्येक्षात सामाजिक जीवनात उतरवून ते ” लोकसेवा ” करत असतात . कर्जत शहरात ” स्वच्छतेला ” प्राधान्य देत त्यांनी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी उल्हास नदी तीरावरील रस्त्यावर असणारे भगवान महावीर मंदिर – श्री शनी मंदिर ते इशुब शाह बाबा दरगाह व मुस्लिम स्मशान भूमी परिसरात नागरिकांनी या रस्त्याचे पावित्र्य राखून कचरा टाकून येथील परिसर दुर्गंधीयुक्त करू नये , आपला कचरा – आपली जबाबदारी आहे , म्हणून याची सुरुवात त्यांनी स्वखर्चाने जे सी बी लावून परिसर स्वच्छ केला . याप्रसंगी त्यांनी कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना भेटून या परिसरात फलक व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली असून , लवकरच येथे स्वच्छता राखण्याबाबत उपाय योजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे सांगितले आहे .

दर दिवशी तर दर शनिवारी व गुरुवारी येथे असलेल्या मंदिर व दर्गाह मध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात . या परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपी येऊन मद्यपान करून बाटल्या टाकत व फोडत असल्याचे दिसून येत असल्याने यावर देखील प्रतिबंध करण्याची मागणी त्यांनी केली , तर या निसर्गरम्य रस्त्यावर सकाळच्या प्रहरी ” मॉर्निंग वॉक ” साठी चालल्यास कर्जतकर नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहील , यासाठी ” आनंद ” लुटण्यास येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले .

याप्रसंगी त्यांनी सर्वांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी या सामाजिक उपक्रमास शिवसेना कर्जत शहर संघटक नदीम भाई युसूफ खान यांच्या समवेत लियाकतआली खान , रहीम शेख यांनी देखील मोलाचे सहकार्य केले . त्यांचे हे कार्य कर्जतकर नागरिकांना नक्कीच ” प्रेरणादायी ” ठरेल , यांत शंकाच नसेल .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!