Uncategorized

….” मातब्बर उमेदवार देऊन परिवर्तन विकास आघाडीचे कर्जतमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन “……

कर्जत शहरातून केले , आता या निवडणुकीत तालुक्यातून " हद्दपार " करणार - मधुकर भाऊ घारे

” ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादीचे ” , शिवसेना शिंदे गटाला आव्हान……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जतमध्ये आज बुधवार दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने ” परिवर्तन विकास आघाडी ” मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषद निवडणुकीचे ६ तर पंचायत समितीचे १२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज प्रशासकीय भवनात निवडणूक निर्णायक अधिकारी प्रकाश संपकाळ यांच्याकडे दाखल केले . यावेळी मोठ्या संख्येने दोन्ही पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते , महिला पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय ते प्रशासकीय भवन येथे भव्य रॅलीत घोषणाबाजी करत भव्य शक्ती प्रदर्शन केले .

कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव केला असून आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत देखील परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेला तालुक्यातून हद्दपार करणार , असे खोचक उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मधुकर भाऊ घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या काल व्यक्त केलेल्या वक्तव्याला उत्तर दिले . आमच्या नेत्यांना खोट्या नाटया केसेस मध्ये अडकवून गोवले , मात्र येथील सुज्ञ जनता खर काय ते सर्व जाणून आहे , सर्व मतदार आमच्या उमेदवारांना निवडून देऊन तुम्हालाच भुईसपाट करून परिवर्तन विकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा येथे फडकेल , असा विश्वास यावेळी मधुकर भाऊ घारे यांनी व्यक्त केला. तर येथील खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हि आमच्या बरोबर असून त्यांचे कार्यकर्ते प्रामाणिक आहेत , तुम्ही विकले गेले आहेत , असे सडेतोड उत्तर त्यांनी याप्रसंगी दिले . तर उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी ६ जिल्हा परिषद व १२ पंचायत समितीवर परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार निवडून येऊन आमचाच झेंडा डौलाने फडकेल असा विश्वास व्यक्त केला .

यावेळी या भव्य रॅलीत ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत , राष्ट्रवादीचे जिल्हा नेते अशोक शेठ भोपतराव , बंधू पाटील , मधुकर भाऊ घारे , नेरळ मा. सरपंच भगवान शेठ चंचे , खांडपे मा. सरपंच नमिता घारे , विधानसभा अध्यक्ष ॲड. पूजा सुर्वे , कर्जत ता.अध्यक्ष ॲड. रंजना धुळे , संपर्क प्रमुख भिवसेन बडेकर , ठाकरे सेना ता. प्रमुख बाजीराव दळवी , राष्ट्रवादी ता. प्रमुख दिपक श्रीखंडे , युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर , पंढरीनाथ राऊत , प्रदीप ठाकरे , अरुण हरपुडे , नगरसेवक संतोष पाटील , नगरसेवक कुमेश मोरे , नगरसेवक बाबू पाटील , मा. नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड , युवा नेते योगेश आप्पा गायकवाड , रोहिदास मोरे , प्रथमेश मोरे , युवा नेते केतन बेलोसे , ॲड . संपद हडप , सुरेश बोराडे , प्रमिला बोराडे , त्याचप्रमाणे दोन्ही पक्षाचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते , महिला उपस्थित होत्या , तर दोन्ही पक्षाचे उमेदवार उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!