….” मनसे ची पंचायत समिती निवडणुकीत झेप “…..
उकरुळ पंचायत समिती गणातून " सौ. प्रियंका जितेंद्र पाटील " यांची उमेदवारी !

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत झेप घेऊन उकरुळ पंचायत समिती गणातून त्यांच्या पत्नी ” सौ. प्रियंका जितेंद्र पाटील ” यांची उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या प्रभागात यावेळी चुरशीची लढाई होणार आहे .
उकरुळ पंचायत समिती गणात मनसे ची ताकद मोठ्या प्रमाणात असून अनेक सामाजिक कार्यात मनसे अग्रेसर असून अनेक उपक्रम घेऊन नागरिकांच्या संपर्कात आहेत . त्यामुळे उकरुळ गणात मनसेचे पारडे जड आहे .
कर्जत तालुक्यात मनसे ची युती किंवा आघाडी अद्याप झाली नसून मुंबई निवडणुकीत जरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी येथील ठाकरे सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची परिवर्तन विकास आघाडी बनवली आहे , तर आमदार महेंद्र शेठ थोरवे हे देखील मनसे पक्षाशी बोलणी करत आहेत , मात्र अजून कुणाशीही पक्की बोलणी झाली नसल्याचे मत महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांनी व्यक्त केले . यावेळी उमेदवारी अर्ज भरताना मनसे पदाधिकारी व मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .



