…..” कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी आमचाच “…..
शिवसेना - भाजपा - आर पी आय - शेकाप पक्षांची अभेद्य महायुती !

कर्जतमध्ये ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” व सर्व पक्षीय ” नेत्यांचा ” पत्रकार परिषदेत एल्गार…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात महायुती बद्दल होणारी उलट सुलट चर्चा आता थांबणार असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ” शिवसेना – भाजपा – आर पी आय – शेकाप ” अशी ” अभेद्य महायुती ” झाल्याची घोषणा कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांनी केली असून सर्वत्र महायुतीचाच विजयी होणार व भगवा फडकणार , यावेळी जिल्हा परिषदेच्या ६ जागा व पंचायत समितीच्या ६ जागा शिवसेनेला , भाजपला पंचायत समितीच्या ३ जागा , तर शेकापला पंचायत समितीच्या ३ जागा , असे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार महेंद्र शेठ थोरवे व सर्व पक्षीय नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जाहीर केले .
यावेळी या पत्रकार परिषदेत आमदार महेंद्र शेठ थोरवे , भाजप जिल्हा महासचिव दिपक बेहेरे , आर पी आय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड , शेकाप नेते तानाजी मते , भाजप जिल्हा नेते तानाजी चव्हाण , भाजप जिल्हा सचिव रमेश दादा मुंढे , भाजप चे शरद भाऊ लाड , आर पी आय कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर , शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , आर पी आय प्रदेश नेते मारुती दादा गायकवाड , भाजपचे राजेश भगत , शेकापचे चिटणीस राम राणे , भाजप कर्जत ग्रामीण मंडल अध्यक्ष मसणे, आर पी आय प्रभारी अध्यक्ष मनोज गायकवाड , युवासेना प्रमुख अमर मिसाळ , भाजप सचिव अतुल बडगुजर , नगरसेवक संकेत भासे त्याचप्रमाणे सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
याप्रसंगी महायुतीचा ” एल्गार ” करताना आमदार महेंद्र शेठ थोरवे म्हणाले की , आम्ही सर्व पक्ष महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीस सामोरे जाणार आहोत , त्यामाध्यमातून पुढील काळात अधिक ” विकासाला ” प्राधान्य देणार असून राज्यातून जास्तीत जास्त ” निधी ” आणून ” विकास ” आम्ही साधणार आहोत . सदरची महायुती हि आमदार प्रशांत ठाकूर , आमदार महेश बालदी व मी स्वतः असे सर्वांनी मिळून घोषित केली आहे , यावर प्रकाश टाकत आम्ही एकत्रित येऊन लढणार आहोत , या निवडणुकीत विजयी ” महायुतीचाच ” होणार आहे . आमची महायुती भक्कम आहे , येथे भगवाच फडकणार , हे सांगितले .
कर्जत मतदार संघात ” कटू नीतीचे व खुन्नस बाजीचे ” राजकारण खेळले जात असून म्हणूनच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष वार्ड वाईज ” गल्लीत ” फिरत असल्याचे दिसून येत आहे , हे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी स्पष्ट करत विरोधकांवर आगपाखड केली , तर आर पी आय चे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी आमचा पक्ष महायुतीतील पूर्वापार पक्ष असल्याने आर पी आय पक्ष कधीच नाराज नाही . आमची जिथे ताकद आहे तिथे आम्ही निवडणूक लढतो , मात्र आता एकही जागा अनुसूचित आरक्षित नसल्याने आम्हाला जागा मिळाली नसून आम्ही मित्र पक्षाला मदत करणार आहोत , हे स्पष्ट केले .
नगर पालिकेत खोपोली – कर्जत – माथेरान येथे आम्ही महायुतीतून सर्व पक्ष लढलो , परंतु कर्जतमध्ये आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले , मात्र आम्ही सर्व बाबींचा विचार विनिमय केला आहे , हे सांगत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी ६ जिल्हा परिषद व १२ पंचायत समिती निवडणुकीत आम्ही मातब्बर उमेदवार उभे केले असून नक्कीच येथे महायुतीचा भगवा फडकेल , असे जाहीर केले .
तर शेकापचे तानाजी मते यांनी शेकापची ताकद असलेला कळंब कशेळे हा गट आरक्षित असल्याने आम्ही उमेदवार दिले नसून आम्ही महायुतीत सामील होत निवडणुकीस सामोरे जाणार आहोत , यापूर्वी विधानसभेत आम्ही परिवर्तन विकास आघाडी सोबत होतो , मात्र त्यांचे नेते वापर करून फेकून देत असल्याचे दिसून आल्याने या मतदार संघाचे सक्षम नेतृत्व आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण कर्जत तालुका शेकाप महायुतीत सामील झाल्याचे त्यांनी सांगितले .



