Uncategorized

….” कर्जत नगर परिषदेचा उपनगराध्यक्ष कोण होणार “…..

ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक " संतोष दादा पाटील " यांच्या नावाची चर्चा !

उद्या शुक्रवारी नामनिर्देशक अर्ज सादर करणार….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषदेचा ” उपनगराध्यक्ष ” पदी कुणाची वर्णी लागणार , याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून , याचे कोडे उद्या शुक्रवार दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी समजणार आहे . उद्या नामनिर्देशन अर्ज सादर होणार आहे . कर्जत नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष – स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष – व इतर पक्षांची सत्ता आली असून त्यामाध्यमातून नगराध्यक्ष पदी ओबीसी महिला ” सौ. पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे ” या थेट ” नगराध्यक्ष ” पदी निवडून आल्या आहेत . त्यामुळे साहजिकच उपनगराध्यक्ष हे पद ठाकरे शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे . ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक ” संतोष दादा पाटील ” यांच्या नावाची जोरदार चर्चा असून तेच उपनगराध्यक्ष होतील , असेच काहीसे चित्र आहे .

कर्जत नगर परिषदेत झालेल्या अटीतटीच्या लढतीत कर्जत परिवर्तन विकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे – ०८ , शिवसेना ठाकरे पक्ष – ०४ ,अपक्ष – ०१ तर महायुतीतील शिवसेना शिंदे गट – ०७ ,

भाजप – ०१ असे पक्षीय बलाबल निवडून आले आहेत . त्यामुळे विरोधक महायुतीतील शिवसेना – भाजप – आर पी आय हे देखील या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उडी घेऊन उमेदवारी लढण्याची चिन्ह असल्यास कुठलाही ” दगाफटका ” न होण्यासाठी परिवर्तन विकास आघाडी नक्कीच सावधगिरीची भूमिका घेऊन सर्व नगरसेवकांना काही सूचना देण्यासाठी एकत्रित राहून आजच गायब होणार व उद्या सकाळी ११ वाजता नगर परिषद कार्यालयात येतील , असे डावपेच आखण्याचे चित्र असेल .

ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संतोष दादा पाटील यांचा आजपर्यंतचा राजकीय अनुभव , त्यांचा शांत स्वभाव , कार्य करण्याची पद्धत , विकास कार्यावर जोर , व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची व काम करण्याची त्यांची शैली असल्यामुळे या उपनगराध्यक्ष पदाला साजेसे त्यांचे कार्य असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष श्रेष्ठी तथा उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत सर्वांच्या सहमतीने त्यांच्याच नावाला पसंती देतील , हेच त्रिवार सत्य असेल .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!