Uncategorized

…..” कर्जत नगर परिषद निवडणुकीतील पराभवामुळे भाजपाला आत्मचिंतन करण्याची गरज “…..

नेते - पदाधिकारी - कार्यकर्त्यांच्या " अती आत्मविश्वासामुळे " पदरी निराशा !

कर्जतमध्ये चर्चेला उधाण…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगरीत झालेल्या कर्जत नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ” दारूण पराभवाला ” सामोरे जावे लागले. आपल्या कार्याचा ” आलेख ” व पक्षाचे ” संख्याबळ ” नसतानाही लढलेली नगराध्यक्ष पद व ७ उमेदवारांच्या निवडणुकीत फक्त ” १ ” जागेवर ” विजय ” मिळाल्याने हिरमोड झालेल्या भाजपाला आता ” आत्मचिंतन ” करण्याची गरज येवून ठेपली आहे . हा पराभव नेते आणि कार्यकर्त्यांच्या ” अती आत्मविश्वासामुळे ” पदरी पडल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळत आहे .

गेली ३० वर्षे अतिशय मेहनतीने कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाला चांगल्या स्थितीत आणलेले होते . यासाठी अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आयुष्य झिजवले आहे . पक्षाचा राजकीय आलेख दर पाच वर्षांनी उंचावत ठेवून सन २०१९ पर्यंत ४ नगरसेवक निवडून आणून सत्तेत येऊन ” उपनगराध्यक्ष ” पद अशी पक्षाची दमदार स्थिती होती . सन २०२५ च्या निवडणुकीत शिवसेना – भाजप – आर पी आय अशी पारंपारिक महायुती करण्यात आली होती . त्यात भाजपाने महिला ओबीसी आरक्षण असलेले थेट नगराध्यक्ष पद व तब्बल ७ जागा पदरात पाडून घेतल्या होत्या . मात्र त्यांच्या ” धुवांधार पराभव ” पदरी पडला असून नगराध्यक्ष पद निवडून आणण्यास भाजप सक्षम होता का ? जिथे पूर्वी ४ नगरसेवक होते , त्या प्रभागात देखील पराभवाला सामोरे जावे लागल्याने , याचे उत्तर तपासण्यास ” आत्मचिंतन ” करण्याची गरज येवून ठेपली आहे .

कर्जत नगर परिषद हद्दीत भाजपात खूपच ” धुसफूस ” या अगोदर पासूनच पहाण्यास मिळत आहे . गटातटात वावरत असलेली भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यात दिसत आहे . यावर तक्रारी करूनही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कधीच कार्यकर्त्यांत ” समेट ” घडवून आणलेला नसल्याची स्थिती होती . पक्ष नेतृत्वाने नवीन उमेदवारांना दिलेल्या संधीमुळे त्याचा ” फटका ” थेट नगराध्यक्ष पदाच्या मतांवर झालेला दिसला , तर एका घरात २ उमेदवारी , जैन समाजाला न दिलेली उमेदवारी , पूर्वीच्या ४ नगरसेवकांनी आपल्या प्रभागात नागरिकांसाठी काय काय विकासात्मक कामे केली ? सत्तेत असल्याने नागरिकांच्या समस्या कित्ती सोडवल्या ? याचा लेखा जोखा कधीच कुठल्या जिल्हा पदाधिकारी की इतर तालुका , शहराच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांना विचारलेला दिसला नाही , त्यामुळे आता पर्यंत काय कामे केली , यावर नगरसेवकांवर कुणाचेच ” अंकुश ” दिसले नाही . प्रभागाबरोबरच शहरात सामाजिक कार्याबरोबरच विकासात्मक कार्याचा अभाव दिसत होता . एकमेकांतील मतभेद हे देखील पराभवास प्रमुख कारण दिसले , तर शिबिरे भरवून आपले नाव कसे मोठे होईल , यांत समाधानी दिसलेले पदाधिकारी व कार्यकर्ते ” सपशेल अपयशी ” ठरले असून अनुसूचित जाती दहिवली प्रभाग क्रमांक ” ०८ ” मधून भाजपाने फक्त यश संपादन केल्याचे चित्र दिसत असून पूर्वी उपनगराध्यक्ष पद व ४ नगरसेवक म्हणून ” तोऱ्यात ” असलेला भाजप पक्ष , नगराध्यक्ष पद पदरात पाडून देखील व पूर्वी नगरसेवक निवडून आलेले प्रभाग देखील गमावल्याने ” अती घाई – संकटात नेइ ” , अशी परिस्थिती भाजपची कर्जत शहरात येऊन ठेपली आहे. देशात सत्ता – राज्यात सत्ता – तालुक्यात सत्ता – शहरात सत्ता असताना पराभवाचे गालबोट रुपी ग्रहण का ? याचे उत्तर भाजप पक्षाला शोधावे लागणार आहे .

त्यामुळे आता नुसत्या ” पिठावर रेघोट्या ” न मारता पुढील होणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती व ग्रामपंचायती निवडणुकीसाठी भाजप प्रदेश अध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण , आमदार प्रशांत ठाकूर , माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी जिल्हा ,तालुका , शहर पदाधिकारी , कार्यकर्ते काय काम करतात ? यावर ” कंट्रोल ” ठेवून आत्मचिंतन करणे गरजेचे असल्याची जोरदार चर्चा सध्या भाजपात व कर्जत नगरीत होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!