…..” कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याची सतर्क राहून चांगली कामगिरी “…..
रेल्वे गाडीत विसरलेली " सॅगबॅग " परत मिळाल्याने रेल्वे प्रवासी समाधानी !

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ” तानाजी खाडे ” यांची पोलिसांना शाबासकीची थाप…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
आजच्या या ” धकाधकीच्या ” जीवनात प्रत्येकाच्या डोक्यात हजारो विचारांचे ” काहूर ” असते , म्हणूनच आपल्या जवळची वस्तू देखील कधी कधी लक्षात न आल्याने रेल्वेच्या भरगच्च भरलेल्या प्रवाशांच्या गर्दीत आपली नेहमीची ” सोबतीन ” म्हणजे आपली ” सॅगबॅग ” देखील विसरली जाते . हा विसराळूपणा कायदा व्यवस्था व पोलीस यंत्रणा सतर्क असल्यानेच या वस्तू ज्यांना त्यांना परत मिळतात .
अशीच एक घटना मंगळवार दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी रेल्वे प्रवाशी ” स्वप्नील अशोक पालकर ” वय ३३ वर्ष , राहणार रूम नंबर 04- C विंग अविनाश गायकवाड नगर , बदलापूर – ईस्ट , हे CSTM ते खोपोली या लोकल ट्रेनने रात्रौ सीएसएमटी ते बदलापूर असा प्रवास करत असताना त्यांनी त्यांची सॅगबॅग रॅकवर ठेवली होती. सदरचे प्रवासी हे बदलापूर येथे उतरले असता थोड्यावेळाने त्यांच्या लक्षात आले की, त्यांची काळ्या रंगाची सॅकबॅग ही लोकलमध्ये विसरले आहेत. तोपर्यंत लोकल निघून गेली होती . सदरची खोपोली लोकल ही कर्जत रेल्वे स्टेशन येथे आल्यावर एक प्रवाशी यांनी रात्रपाळीचे ठाणे अंमलदार पोहवा/308 ” कुणाल साळुंखे ” यांच्याकडे जमा केली असता नंतर दिवसपाळीचे ठाणे अंमलदार महिला पोहवा/2662 ” सुमित्रा दोंदे ” यांनी सदर प्रवाशी स्वप्नील पालकर यांना फोन करून त्यांना कर्जत रेल्वे पोलीस ठाणेत बोलावून त्यांची सॅक बॅग आज दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी त्यांना त्यांच्या सामानासह परत केली .
सदर सॅग बॅग मध्ये एक डेल कंपनीचा लॅपटॉप चार्जर 40,000/- ₹ व इतर सामानासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे यांच्या समक्ष बॅग त्यांचीच आहे , अशी खात्री करून त्यांना परत केली. याबाबत रेल्वे प्रवासी स्वप्नील पालकर हे समाधानी होऊन त्यांनी कर्जत रेल्वे पोलिसांचे आभार मानले , तर सतर्क चांगली कामगिरी केली म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे यांनी पोलीस जवानांना शाबासकीची थाप दिली .




