…..” हम भी किसी से कम नहीं “……
कर्जतमध्ये काँग्रेस पक्ष " स्वबळावर " जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात !

जि. प. ३ व प. समितीची १ जागा लढणार…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात काँग्रेस पक्षाचा एक ” राजकीय इतिहास ” आहे . अनेकांनी येथे ” सत्ता स्थाने ” भोगली आहेत , मात्र आता इतर पक्षाच्या ताकदीमुळे काँग्रेसच्या नशिबी ” राजकीय संन्यास ” येत असल्याने व आघाडीत जागा न दिल्याने , म्हणूनच आता कर्जत तालुक्यात आघाडीत सामील न होता स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उतरून ” हम भी किसी से कम नहीं ” अशी भूमिका आता येथील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेचे ६ आणि पंचायत समितीच्या १२ जागा पैकी ३ जिल्हा परिषद व १ पंचायत समितीची जागा काँग्रेस पक्ष लढणार आहेत . त्यात काँग्रेसकडून जिल्हा परिषद सीता टेंबे – माणगाव तर्फे वरेडी, प्रियांका पवार – मोठे वेणगाव , चंदकांत मांडे – कडाव आणि नेरळ पंचायत समिती गणामध्ये आसिफ अत्तार यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये नेरळ जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आला होता. मात्र आता मुदत संपून २ वर्षानंतर होत असलेल्या निवडणुकीत आघाडीत कुठेही स्थान नसल्याने जिल्हा श्रेष्ठींनी घेतलेल्या भूमिकेमुळे ” स्वबळाचा नारा ” कर्जत तालुक्यात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय गवळी यांनी घेतला आहे .
लोकसभा , विधानसभा निवडणुकीत महा आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षाला येथील परिवर्तन विकास आघाडीने वापर करून घेऊन एक हि जागा न दिल्याने कार्यकर्ते संतापले आहेत . आमचे उमेदवार नक्कीच निवडून येतील , अशी ग्वाही देखील उमेदवारी अर्ज भरण्यास आलेले पदाधिकारी यांनी मत व्यक्त केले आहे.




