…..” गुंडगे प्रिमियर लीग – २०२६ ( पर्व ७ वे ) जल्लोषात “……
अत्यंत चुरशीच्या अंतिम स्पर्धेत संघ मालक " स्मिता सविते " यांचा " चेडोबा लायन्स संघ " विजयी !

कर्णधार ” करण सविते ” याची दमदार खेळी…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागात ” गुंडगे प्रिमियर लीग – २०२६ ” ( पर्व ७ वे ) हे क्रिकेटचे सामने अत्यंत ” जल्लोषात व उत्साहात ” खेळले गेले . या रोमांचकारी स्पर्धेत संघ मालक ” स्मिता दिनेश सविते ” यांच्या ” चेडोबा लायन्स ” संघाने बहारदार खेळ खेळत विजयाचे मानकरी ठरत आकर्षक ट्रॉफी व पारितोषिक पटकावले . कर्जत नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. पुष्पा ताई हरिश्चंद्र दगडे व माजी उपनगराध्यक्ष लालधारी शेठ पाल यांच्या शुभहस्ते बॅटिंग व बॉलिंग करून या सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले .
या गुंडगे प्रीमियर लीग सामन्यात एकूण १० संघाने भाग घेतला होता . शनिवार दिनांक १० व रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ असे २ दिवस हे सामने खेळले गेले . या दोन दिवस सुरू असलेले रंगतदार सामने बघण्यासाठी गुंडगे प्रभाग इतर परिसरातील अनेक क्रिकेट प्रेमींनी हजेरी लावली होती . गुंडगे प्रभागात क्रिकेट खेळात अत्यंत प्रसिद्ध असे खेळाडू होवून गेले तर अजूनही शानदार खेळ खेळणारे खेळाडू घडत आहेत .
शेवटचा सामना संघ मालक स्मिता सविते यांचा ” चेडोबा लायन्स संघ ” विरुद्ध संघ मालक प्रल्हाद मराडे यांचा ” वैष्णवी ११ स्टार ” यांच्यात अत्यंत अटीतटीचा सामना झाला , वैष्णवी ११ स्टार यांनी १२ चेंडूत २८ धावा केल्या होत्या . मात्र चेडोबा लायन्स संघाचा अष्टपैलू कर्णधार करण दिनेश सविते याच्या नेत्रदीपक फटकेबाजीने हे आव्हान त्याने पेलले . अगदी शेवटच्या चेंडूत ४ धावा हव्या होत्या त्यावेळी चेडोबा लायन्स संघाचा कर्णधार करण सविते याने दमदार खेळाचे प्रदर्शन दाखवत ” चौकार ” मारून बहारदार ” विजयी ” संपादन करून ” गुंडगे प्रीमियर लीग – २०२६ ” वर आपले नाव कोरले . यावेळी कर्णधार करण सविते यांस सर्वांनी उचलून ” विजयाचा जल्लोष ” साजरा केला .
विजेता चेडोबा लायन्स संघ मालक स्मिता दिनेश सविते यांच्या संघात अतुल नवले , कर्णधार – करण सविते , सूरज म्हामुनकर , मधुकर जाधव , गौरव सोनावणे , राहुल धोत्रे , अनिकेत मोरे , पुष्कर कानिटकर , शुभम वारघडे , साहिल मोरे , मयुर पवार , प्रथमेश पवार , मोसिन सय्यद , आदी खेळाडूंनी नेत्रदीपक खेळ , बहारदार क्षेत्ररक्षण , फिरकी गोलंदाजी करत अखेर यश संपादन केले .
विजेत्या चेडोबा लायन्स संघास नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे , माजी उपनगराध्यक्ष लालधारी शेठ पाल , माजी नगरसेविका बिनीता घुमरे , माजी नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड , माजी नगरसेवक दिपक भाऊ मोरे , शिवसेना शहर प्रमुख संजय मोहिते , महेंद्र कानिटकर , अजय पाल , विजय पाल , यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले . यावेळी दुसरे पारितोषिक प्रल्हाद मराडे यांचा संघ ” वैष्णवी ११ स्टार ” , तिसरे विजेते अजय पाल यांचा संघ ” परी ११ ” , तर चौथे विजेते रोहन मोरे यांचा संघ ” सार्थक ११ ” हे मानकरी ठरले .




