Uncategorized

बुद्ध नगर येथे नगराध्यक्षा ” पुष्पाताई दगडे व नगरसेविकांचा ” सन्मान सोहळा संपन्न !

" हळदी - कुंकू " कार्यक्रमाने प्रभागातील महिलांचा केला यथोचित सन्मान....

नगरसेविका ” सौ. सुमिता योगेश आप्पा गायकवाड ” यांचा पुढाकार…..

 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

माघ महिन्यात महिला एकमेकींना ” सौभाग्याचे ” लेन म्हणून ” हळदी – कुंकू ” लावून व ” वाण ” रुपी भेट वस्तू देऊन सोहळा साजरा करतात . नुकत्याच कर्जत नगर परिषदेच्या निवडणुका पार पडून ” परिवर्तन विकास आघाडी ” ची सत्ता आली असून थेट नगराध्यक्ष पदी ” सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे ” या विजयी झाल्या . कर्जत बुद्ध नगर प्रभाग क्रमांक ४ येथे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकमुखी सत्ता येऊन ” सौ. सुमिता योगेश आप्पा गायकवाड ” या विजयी झाल्या . यानिमित्ताने नगराध्यक्षा सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे व नव निर्वाचित नगरसेविकांचा ” सन्मान सोहळा व हळदी कुंकू ” समारंभ कार्यक्रम शनिवार दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी आयोजक नवनिर्वाचित नगरसेविका ” सौ. सुमिता योगेश आप्पा गायकवाड ” यांच्या पुढाकाराने सायंकाळी ७.०० वाजता मोठ्या उत्साहात व हर्षभरीत वातावरणात संपन्न झाला . यानिमित्ताने प्रभागातील अनेक सौभाग्यवती महिला या हळदी कुंकू समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद वाढवला.

कर्जत बुद्ध नगर प्रभाग क्रमांक ४ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका ” सौ सुमिता योगेश आप्पा गायकवाड ” यांच्या पुढाकाराने सायंकाळी ७.०० वाजता नगराध्यक्षा व नगरसेविका यांचा सत्कार व हळदी कुंकू कार्यक्रम तसेच मनोरंजन चे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला .यानिमित्ताने नगराध्यक्षा सौ पुष्पाताई दगडे , नगरसेविका हर्षाली गायकवाड , नगरसेविका अंजली कडू ,नगरसेविका नेहा शिंदे , नगरसेविका सुचिता खोत , माजी नगरसेविका मधुरा चंदन , माजी नगरसेविका संचिता पाटील यांचा शाल , गुलाबपुष्प , सन्मानचिन्ह देऊन येथोचित सत्कार करण्यात आला . त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक ४ मधील कर्जत बुद्ध नगर , पाटील आळी , डेक्कन जिमखाना , कचेरी खालील परिसर व इतर अनेक महिला उपस्थित होत्या . त्यांना देखील हळदी कुंकू करून भेट वस्तू , गुलाबपुष्प , तिळगुळ व फराळ देण्यात आला .

तर प्रत्येक महिलेचे नाव व नंबर असलेली ” लकी ड्रॉ ” काढून पहिल्या तीन भाग्यवान सौभाग्यवतींची चिठ्ठी छोटी ” परी – सह्याद्री ” या नगरसेविका सुमिता गायकवाड यांच्या मुलीने काढून त्यांना भेट वस्तू देऊन उखाणे नाव घेण्यास सांगितले . गाण्यांच्या सुमधुर आवाजात जूने पारंपारिक खेळ खेळून अगदी ” रोमांचकारी – हर्षभरीत ” वातावरणात सर्वांनी भाग घेऊन या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला .

या कार्यक्रमास कर्जत बुद्ध नगर येथील ” सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या ” सर्व महिला पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले . आयोजक नगरसेविका ” सौ. सुमिता योगेश आप्पा गायकवाड ” यांनी उपस्थित सर्व सौभाग्यवती महिला , ज्येष्ठ महिला व युवतींचे आभार व्यक्त केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!