Uncategorized

…..” कर्जत शहराचे नंदनवन करण्यासाठी महायुतीला मते द्या “…..

रायगड मधील अनेकांचे " राजकीय भवितव्य " सुनील तटकरे यांनी उध्वस्त केले - आमदार महेंद्र शेठ थोरवे

कर्जतमध्ये महायुतीची ” वादळी ” प्रचार सभेत ” विजयाचा ” एल्गार…..

 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत मतदार संघातील नागरिकांनी मला निवडून दिले , मी जे ” स्वप्न ” बघितले , जी ” संकल्पना ” केली , ती मी पूर्ण करून विकासाला गती दिली , तब्बल २९०० कोटी रुपयांचा निधी आणला , तसाच या कर्जत नगरीचे ” नंदनवन ” करायचे असेल तर कर्जत नगर परिषदेवर महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ” डॉ सौ स्वाती अक्षय लाड ” यांना व महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा , असे आवाहन कर्जत खालापूर मतदार संघाचे ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांनी कर्जतमध्ये रविवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता आयोजित केलेल्या महायुतीच्या भव्य प्रचार सभेत केले .

यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा आमदार रविंद्रजी चव्हाण , आमदार महेंद्र शेठ थोरवे , आमदार प्रशांत ठाकूर , माजी आमदार सुरेश भाऊ लाड , भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी , शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , जिल्हा उपाध्यक्ष वसंत शेठ भोईर , शिवसेना कर्जत ता प्रमुख सुदाम दादा पवाळी , आर पी आय कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर , कर्जत मंडल अध्यक्ष राजेश दादा लाड , भाजप विधानसभा प्रमुख किरण ठाकरे , आर पी आय कर्जत तालुका प्रभारी अध्यक्ष मनोज भाई गायकवाड , महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ सौ स्वाती अक्षय लाड व २१ उमेदवार यावेळी उपस्थित होते .

यावेळी उपस्थित जन सागरास मार्गदर्शन करताना आमदार महेंद्र शेठ थोरवे पुढे म्हणाले की , या कर्जतमध्ये अनेक विकास कामे केली , यांत श्रीराम पुलावर नवीन ब्रीज चे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे . नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी ५८ कोटीची योजना आणली , शहरात शिवसृष्टी , छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक , भव्य श्री विठ्ठल मूर्ती प्रती आळंदी , भव्य श्रीरामाची मूर्ती , श्री नानासाहेब धर्माधिकारी भव्य प्रवेशद्वार , उल्हास नदी संवर्धन व सुशोभीकरण , रस्ते काँक्रीटीकरण अशी विविध विकासकाने केली . माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थकी ठरवत आहे . कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना मी विकास साधला , पुन्हा एकदा कर्जत शहरात विकास साधण्यासाठी महायुतीला विजयी करा , मी एक व्यापारी असल्याने व्यापाऱ्यांचा आमदार आहे , भ्रष्टाचार मुक्त भारत देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी केले , gst कपात केली , ऐतिहासिक कामे देशात झाली आहेत , कोलमडलेली अर्थ व्यवस्था मजबूत झाली. श्री राम मंदिर उभारण्यात आले , राज्यात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून विकासाचा झंझावात सुरू आहे , यावर प्रकाश टाकत कर्जत मधील राहिलेल्या समस्या मार्गी लावायच्या आहेत , उपजिल्हा रुग्णालय २०० बेड चे होणार , लाडकी बहीण योजना म्हणजे महिला सक्षमीकरणाचे काम आहे , म्हणूनच कर्जतचा सर्वांगिण विकास होण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उच्चशिक्षित डॉ . सौ. स्वाती लाड यांना निवडून देणे गरजेचे आहे , असे मत व्यक्त केले .

यावेळी त्यांचे राजकीय विरोधक खासदार सुनील तटकरे यांची आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी चांगलीच हजेरी घेतली . कर्जतमध्ये असभ्यतेचे दर्शन म्हणजे सुनील तटकरे यांच्या भाषणातून दिसून आल्याचे सांगत त्यांच्या अंगात ” वेताळ ” घुसला होता का ? असा सवाल उपस्थित करत , आता dna म्हणणे हा कॉमन शब्द झाला आहे , तुमचा राजकीय dna काय आहे , ते तपासावा लागेल , अस सहज कोणीही म्हणतो , अशी स्पष्टोक्ती करत त्यांनी dna चा लाँग फॉर्म सांगितला . आता ते कर्जतच्या विकासाच्या गप्पा मारतात मग इतक्या वर्षी कर्जतचा विकास का केला नाही ? असा संतप्त सवाल उपस्थित करत त्यांनी माजी आमदार सुरेश लाड यांना तटकरे यांनी ” गुमराह ” करण्याचं काम केले , असा आरोप करत माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांना मी म्हटल फक्त तुमचा आशीर्वाद द्या , तुमची सून माझी बहीण आहे , मी त्यांना निवडून आणण्याचं काम करेन , असे सांगितले , सुनील तटकरे यांचा dna खराब आहे , यावर त्यांनी ते लहान असताना मातीत खेळताना ” माती ” खात असतील , ती अद्यापी काढली नसेल म्हणून त्यांचा dna खराब असल्याची गोष्ट कथन केली . इथे कोंढाण्याची माती खाल्ली , सिंचन घोटाळा केला , ” विकासाला मांजर आडवी गेली ” असे वक्तव्य केले तर ठणठण करता , हे माझ्या मतदार संघात चालणार नाही , असे ठणकावून आमदार महेंद्र शेठ यांनी सांगितले . तटकरे यांना २०१९ ला सुरेश लाड हे आमदार म्हणून म्हणून नको होते , सुरेश भाऊ लाड निवडून आले असते तर त्यांची मुलगी ” पालकमंत्री ” झाली नसती , असा पर्दाफाश त्यांनी केला . पदरात घेतलेल्या बॅरिस्टर अतुल्यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसले , असा आरोप करत रायगडात अशोक साबळे , माणिक जगताप , सुरेश लाड , बंधू पाटील या सर्वांना व अनेकांना संपवण्याचे काम तटकरेंनी केल्याचे त्यांनी सांगून , इथे येऊन छाती पिटून , तंगडी वर करता , आणि बोलता , ते इथे चालणार नाही , बंधू पाटील यांचे राजकीय क्षेत्र उध्वस्त केले , आणि आता माफी मागता , त्यांचा मुलगा पंकज पाटील याला बरोबर घेतले मात्र त्याने माझ्या मागे गटबाजी करून पाठीत खंजीर खुपसत होता , हे वेळीच समजले म्हणून त्याला बाजूला केले , असा खुलासा त्यांनी केला . कर्जतमध्ये ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ” आम्ही तयार करत आहोत , असे सांगितले .

म्हणूनच सर्व जनतेसाठी कर्जतचे ” नंदनवन ” करण्यासाठीच आम्हाला मते द्या , व शिवसेना – भाजप – आर पी आय महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ सौ स्वाती अक्षय लाड व सर्व २१ उमेदवारांना ” धनुष्य बाण व कमळ ” या चिन्हावर बटण दाबून भरघोस मतांनी निवडून द्या , विजयी करा , असे आवाहन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केले . या वादळी झालेल्या प्रचार सभेत कर्जतकर नागरिक व महायुतीचे कार्यकर्ते , महिला , व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!