Uncategorized

…..” हालिवली गावात विविध वस्तूंचे वाटप करून मानवसेवा “……

" मानव जीवन सेवा ट्रस्ट व जोगेश्वरी महिला गृह उद्योगाचा " स्तुत्य उपक्रम !

देवजी जाधव – मीना जाधव व मा. सरपंच प्रमिला बोराडे – सुरेश बोराडे यांचा पुढाकार……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

” मानव सेवा हिच ईश्वर सेवा ” आहे , या स्तुत्य विचारांनी प्रेरित होऊन गेली अनेक वर्षे ” सामाजिक – राजकीय – धार्मिक – शैक्षणिक ” क्षेत्रात आपणही या समाजाचे काही देणे आहोत , या उदात्त हेतूने नेहमीच विकास कार्यातून गावाचा विकास व गरजवंतांना ” मदतीचा हात ” देऊन ” सत्कर्म ” करणारे कर्जत तालुक्यातील हालिवली ग्रामपंचायत समितीच्या थेट मा. सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे या विविध उपक्रम राबवून ” मानव सेवा ” करत आहेत . यावेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ” मानव जीवन सेवा ट्रस्ट – मुंबई व जोगेश्वरी महिला गृह उद्योग – हालिवली ” यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत हालीवली गावामध्ये ज्येष्ठ नागरिक – विधवा महिला भगिनी – शालेय विद्यार्थी – युवक वर्गासाठी मोठ्या प्रमाणात ब्लॅंकेट , साड्या , सदरे व टी-शर्ट अशा विविध वस्तूंचे वाटप गुरुवार दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता भव्य कार्यक्रमात करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर मानव जीवन सेवा ट्रस्टचे अध्यक्ष ” मान. श्री . देवजी जाधव व मीना जाधव ” तसेच त्यांचे सहकारी यांचे फटाके वाजवून ग्रामस्थांच्या वतीने व हालिवलीच्या थेट मा.सरपंच सौ. प्रमिला बोराडे यांच्याकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल – पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित महिला भगिनी , जेष्ठ नागरिक , विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी श्री. सुरेश बोराडे यांनी पुष्पगुच्छ देऊन व शब्दसुमनांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी मा. सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की ” मानव सेवा – हिच खरी ईश्वर सेवा आहे ” , स्वतः साठी तर पशूपक्षी हि जगतात , परंतु मनुष्य जन्माला आल्यानंतर समाजाच्या हितासाठी मदतीचे काम करण्यात , खरे मनुष्य जन्माचे सार्थक आहे . त्यासाठी मी व माझे पती सुरेश बोराडे आम्ही दोघे याआधी आणि यापुढेही ग्रामदैवत ” श्री भैरवनाथांच्या ” कृपेने आणखीन जोमाने निरपेक्षपणे काम करणार आहोत , असे मत व्यक्त केले. वेळ पडली तर स्वतःची पदर मोड करून आमच्या परीने आम्ही कामे करत आलेलो आहोत , आणि यापुढेही करत राहू , असे आश्वासन सौ. प्रमिला बोराडे यांनी समस्त ग्रामस्थांना दिले . तसेच आपल्या विनंतीला मान देऊन मीनाताई जाधव , देवजी जाधव आणि त्यांच्या सर्व टीमने जे सहकार्य केले , त्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने ” मानव जीवन सेवा ट्रस्ट ” चे मनपूर्वक आभार व्यक्त केले .

अशा प्रकारचे कार्यक्रम आमच्या सरपंच ताई नेहमीच गावामध्ये आयोजित करतात आणि त्यांनी यापुढे असे कार्यक्रम आयोजित करावे , म्हणून ग्रामस्थांनी हालिवली ग्रामपंचायतच्या थेट मा. सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे पाठीवर कौतुकाची थाप दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!