Uncategorized

……” भिवपुरी टाटा पॉवर व्यवस्थापनाला ठाकरे शिवसेनेची टक्कर “…..

भूमीपुत्रांना न्याय देण्यासाठी " उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत " आक्रमक !

  1. मुजोर अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी उद्या ” आमरण उपोषण “……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

भिवपुरी टाटा पॉवर प्रोजेक्टच्या कंपनी व्यवस्थापनाला वारंवार ” चेतावणी ” देऊन सुद्धा स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार व इतर सोई सुविधा बाबत ” मुठमाती ” देऊन आमच्या मागण्या मान्य न करणाऱ्या ” मुजोर ” अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी ” ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत ” आक्रमक झाले असून उद्या दिनांक १७ डिसेंबर २०२५ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी पुकारलेल्या आंदोलनात त्यांच्या बरोबर ” संयुक्त आमरण उपोषणाला ” बसण्याची ” डरकाळी ” फोडली असून त्यांच्या या निर्णयाने आता या आंदोलनाला वेगळीच ” धार ” आली आहे . यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या समवेत , कर्जत तालुका प्रमुख बाजीराव भाई दळवी , कर्जत तालुका संघटक माधव कोळंबे , माजी पंचायत समिती सभापती पंढरीनाथ राऊत , माजी संघटक बाबू घारे , हे ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपोषणाला बसून सहभागी होणार आहेत .

कर्जत तालुक्यातील भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीत येणारे गेली १०० वर्षांचा इतिहास असलेला ” जल विद्युत टाटा पॉवर प्रोजेक्ट ” गेली अनेक वर्षे येथील प्रकल्पग्रस्तांच्या ” हक्क व अधिकारांना ” मूठ माती देत आहे . येथे नव्याने सुरू असलेल्या ” उदंचन प्रकल्प १००० मेगावॅट ” संदर्भात देखील टाटा व्यवस्थापन पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांच्या योजना , मागण्या, नोकरी , रोजगार , उद्योग सेवा , शिक्षण , आरोग्य सेवा , घरे , भरपाई , वन्य माकडांपासून सुरक्षितता , आदी सेवा डावलून कंपनी व्यवस्थापन मनमानी करून प्रकल्पग्रस्तांचा ” हक्क व अधिकार ” डावळत असल्याने संतप्त झालेल्या ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी यापूर्वी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना त्यांचे हक्क अधिकार मिळावे यासाठी केलेल्या पत्र व्यवहाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपले कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी व भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी ” दंड थोपटून ” उभे रहाणार असून या ” दंडेलशाही ” विरोधात बुधवार दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता, भिवपुरी टाटा पॉवर प्रोजेक्ट गेट समोर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या समवेत संयुक्त आमरण उपोषणाला बसणार असल्याचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी जनसंपर्क कार्यालय ” शिवालय ” येथे जाहीर केले . त्यामुळे या आंदोलनाकडे आता सर्वांचेच लक्ष वेधले आहे .

यावेळी ” ठाकरे शिवसेना ” पक्षाचे उपजिल्हा प्रमुख ” नितीन दादा सावंत ” यांच्या समवेत कर्जत तालुका प्रमुख बाजीराव भाई दळवी , माजी सभापती पंढरीनाथ राऊत , मा. विभागप्रमुख सुरेश बोराडे , शहर प्रमुख निलेश भाई घरत , युवा अधिकारी ॲड. संपद हाडप , प्रदीप बदे , अविनाश भासे , योगेश थोरवे , दिनेश भासे ,आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!