अखेर बोलणी यशस्वी , उपोषण स्थगित…..
उपोषणकर्ते सुधाकर भाऊ घारे व नितीन दादा सावंत यांच्या सर्व मागण्या मान्य !

.….” भिवपुरी टाटा पॉवर प्रोजेक्ट चा बडवा म्हात्रे याला आठ दिवसांत निलंबित करा “……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
भिवपुरी टाटा पॉवर प्रोजेक्ट विरोधात केलेले आंदोलन ” हाय हॉल्टेज ” वर असताना मागण्या मान्य न केल्यास आंदोलन चिघळणार , असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे व ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी दिल्याने व्यवस्थापन अधिकारी व पोलीस यंत्रणा काही काळ टेन्शनमध्ये आली असताना अखेर प्रशासनाला स्थानिक भूमिपुत्र व आदिवासी बांधवांसाठी ” नमती ” भूमिका घ्यावी लागली व सर्व मागण्या मान्य करत अखेर हे उपोषण यशस्वी होऊन रात्री ११.३० वाजता स्थगित करण्यात आले . यावेळी मोठ्या संख्येने ” आंदोलनकर्ते ” स्थानिक ग्रामस्थ व दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली , तर ” राडा ” होतो की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली होती . मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असल्याने कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही .
कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथील स्थानिक आदिवासी , ग्रामस्थ यांच्या हक्काच्या जमिनी व घरे घेऊन देशोधडीस लावणाऱ्या ” भिवपुरी टाटा पॉवर प्रोजेक्ट ” व्यवस्थापनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी आमच्या मागण्या मान्य न केल्यास टाटा प्रोजेक्ट गेट मधून आत घुसून व्यवस्थापनाला याचा जाब विचारला जाईल , असा सज्जड इशारा दिला होता , त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता होती . यादरम्यान टाटा प्रोजेक्टचे अधिकारी अभिजीत पाटील , सी बी सिंग , विवेक माटे , व इतर बोलणी करण्यास आलेल्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांना तीन वेळा परत पाठविण्यात आले .
या उपोषणास भिवपुरी टाटा पॉवर प्रोजेक्ट दंडेलशाली विरोधात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे , ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत , जेष्ठ नेते नारायण डामसे , शेकाप नेते तानाजी मते आदी पदाधिकारी आमरण उपोषणाला बुधवार दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता बसले होते . वेळोवेळी येथील स्थानिक नागरिकांना रोजगार , इतर कामे , आरोग्य सेवा , शिक्षण , पुनर्वसन , सोई सुविधा , घरांची नुकसान भरपाई बाबत सांगूनही टाटा प्रोजेक्टचे अधिकारी म्हात्रे हे ऐकत नसल्याने त्यांची हकालपट्टीची जोरदार मागणी सुधाकर भाऊ घारे व नितीन दादा सावंत यांनी लावून धरली , तर दोन दिवसांपूर्वी आदिवासी बांधवांना घरांसाठी पुनर्वसन करताना कुणालाच विश्वासात न घेतल्याने केलेल्या दिशाभूलीवर भूमिपूजन करणाऱ्यांवर पोलीस कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली . त्यामुळे हा तिढा सुटता सुटत नव्हता . मात्र अखेर टाटा पॉवर प्रोजेक्ट व्यवस्थापनाला नमती भूमिका घेऊन उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने हे उपोषण यशस्वी झाले .
भिवपुरी टाटा पॉवर प्रोजेक्ट गेट समोर सकाळपासून सुनील पाटील , साबळे , अशोक भोपतराव , अंकित साखरे , बाजीराव दळवी , बाबू घारे , पंढरीनाथ राऊत , प्रदिप ठाकरे , तानाजी मते , एकनाथ धुळे , बंधू पाटील , दिपक श्रीखंडे , भगवान शेठ भोईर , पंकज पाटील , उमेश आप्पा गायकवाड , मधुकर भाऊ घारे , शैलेश पालकर , अश्विनी पाटील , रंजना धुळे , बिनीता घुमरे , बळवंत घुमरे , निलेश भाई घरत , अरुण हरपुडे , रामदास घरत , सुनील गायकवाड , संतोष बैलमारे , सोमनाथ पालकर , पुष्पा दगडे , गुरुनाथ पालकर , सुवर्णा निळधे , केतन बेलोसे , सोमनाथ ठोंबरे , दिनेश ठोंबरे , बंधू देशमुख , राकेश देशमुख , विशाल माळी , अशोक राऊत , त्याचप्रमाणे राष्ट्रवादी , ठाकरे शिवसेना , शेकाप चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते , स्थानिक ग्रामस्थ , महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.….” भिवपुरी टाटा पॉवर प्रोजेक्ट चा बडवा म्हात्रे याला आठ दिवसांत निलंबित करा “……


