Uncategorized

…..” राज साहेबांचा कट्टर मावळा जनतेच्या दरबारात “……

आमराई - दहिवली प्रभाग क्रमांक ९ अ मधून अपक्ष उमेदवार " मनसे शहर प्रमुख राजेश साळुंखे " देणार निकराची लढत !

आता ” झुंज विजयाच्या ” दिशेने……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे सर्वेसर्वा तथा मराठी हृदय सम्राट ” राज साहेब ठाकरे ” यांनी निवडणुकी संदर्भात दिलेल्या आदेशानुसार मात्र त्यांच्यावर असलेल्या अतूट प्रेमाच्या नात्याने एक कट्टर मनसेसैनिक म्हणून ” माय बाप जनतेला ” न्याय देण्यासाठी कर्जत नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे , की ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत आजपर्यंत १५ वर्षे ” स्वाभिमानाची लढाई ” लढत , निकराची ” झुंज ” देत मनसे पक्ष वाढविण्यात कर्जत शहरात तनमन धन अर्पण करणारे ” मनसे कर्जत शहर प्रमुख राजेश साळुंखे ” यांनी मनसे पक्ष टिकवून ठेवला आहे . आपला आमराई प्रभाग ओबीसी आरक्षित असूनही पक्षाशी एकनिष्ठ रहात इतर पक्षात न जाता त्यांनी ” अपक्ष ” उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीला सामोरे जात आहेत .

कर्जत नगर परिषद प्रभाग क्रमांक ९ ( अ ) आमराई – आकुर्ले – बामचा मळा – इंदिरानगर या परिसरात ते वास्तव्यास असलेल्या मनसे च्या ” बालेकिल्ल्यात ” त्यांनी उमेदवारी भरली असल्याने या प्रभागात त्यांचे समाज कार्य मोठ्या प्रमाणात आहे . या प्रभागात अन्यायाला ” बेधडक झुंज ” देऊन अनेकांना ” न्याय ” दिला असल्याने , प्रभागातील जनतेचा त्यांना जोरदार पाठिंबा आहे . मनसे पक्ष नसानसात असलेला हा राजसाहेबांचा ” मावळा ” गेली अनेक वर्षे गोर गरीब जनतेच्या समस्या घेऊन शासकीय दरबारी लढत आहे , नागरिकांच्या मूलभूत गरजा , ” सत्ताधारी पक्ष ” आजपर्यंत पूर्ण करू शकल्या नाहीत , त्याचा लढा ते आजपर्यंत लढत आहेत , वीज , पाणी , आरोग्य , कचरा , वाहतूक , बेकायदेशीर पार्किंग , तर झालेली कर्जत नगरी ” बजबजपुरी ” यातून जनतेला बाहेर काढण्यासाठी नुसत ” आश्वासन ” नाही तर ” रोखठोक भूमिका ” घेऊन मायबाप जनतेच्या , ” जनता दरबारात ” मनसे शहर प्रमुख राजेश साळुंखे उभे राहून मते मागणार असून , फसवे सत्ताधारी पेक्षा समस्या अनुभवलेला , गरजू – सर्वसामान्य जनतेसाठी आणि शहराच्या समस्यांवर आवाज उठवणारा , सर्वपरिचित, सर्वसामान्य , गरीब कुटुंबातील , महाराष्ट्र सैनिक, कर्जत शहर प्रमुख ” राजेश पिराजी साळुंके ” प्रभाग क्रमांक ९ अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेवर, आपल्यासाठी , गोर गरीब जनतेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत .

लवकरच ते निवडणूक चिन्ह भेटल्यावर आपल्या प्रभागात आजपर्यंतचे ” सत्ताधारी ” , निवडून गेलेले मात्र स्वतःचा विकास करणारे ” नगरसेवक ” यांनी जे केले नाही , ते माझ्या मनात आहे , ते मांडायला, संवाद साधायला , भांडाफोड करायला , येतं आहे , असे परखड मत उमेदवार राजेश पिराजी साळुंके यांनी व्यक्त करत ” आता झुंज विजयाच्या दिशेने ” असा एल्गार दिला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!