…..” प्रत्येक गावात एक प्रमुख कुटुंब असते , म्हणजे त्यांची सावकारी – घराणेशाही असते का ? “……
कर्जत नगर परिषदेत नवनवीन उपक्रमाचा अभ्यास करता यावा म्हणून " शिक्षित नगराध्यक्ष " असणे गरजेचे !

” सुरेश भाऊ लाड ” यांचे पत्रकार परिषदेत भावनिक होत सडेतोड उत्तर……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
निवडणुकी दरम्यान ” ट्रोल मेसेज ” होत असतात , मात्र आपण महिलांचा आदर करणे गरजेचे असून आजपर्यंत मी ते करत आलो आहे , मात्र कर्जत नगर परिषद निवडणुकीत ” परिवर्तन विकास आघाडी ” तील पदाधिकारी सुधाकर घारे यांच्या फेसबुक पेजवर ४ दिवसांपूर्वी माझ्या उच्चशिक्षित सून व महायुतीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ . सौ. स्वाती अक्षय लाड यांच्या बद्दल खालच्या भाषेत केलेली टिका करणे , हे चुकीचे असून तुम्ही तुमचा प्रचार करा , आम्ही आमचा प्रचार करू , असे भावनिक आवाहन कर्जत खालापूर मतदार संघाचे ” माजी आमदार सुरेश भाऊ लाड ” यांनी आज पत्रकार परिषदेत केले . यापुढे जाऊन ते हे हि म्हणाले की , माझ्या कुणी कुटुंबातील अथवा कार्यकर्त्याने परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ पुष्पाताई दगडे यांच्या बद्दल टिका केली असेल , तर मी या पत्रकार परिषदेत माफी मागतो , असे भावनिक मत व्यक्त केले .
परिवर्तन विकास आघाडीतील बरेच पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी पूर्वी माझ्या नेतृत्वाखाली काम केले आहे , त्यानंतर राजकीय पक्षीय बदल झाले , ज्याने त्याने त्यांचा पर्याय निवडला , आता होणाऱ्या कर्जत नगर परिषद निवडणुकीत माझ्या सून बाईंना डॉ सौ . स्वाती अक्षय लाड यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून उभे करण्याचा पक्षाचा आग्रह होता , माझी आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्याने मी यांत भाग घेणार नव्हतो , हा माझा निर्णय होता . भाजप पक्ष नेतृत्व – पदाधिकारी – कार्यकर्त्यांची भूमिका म्हणून मी ” गावकीची बैठक ” लावून मग घेतलेला हा निर्णय आहे , यावर सुरेश भाऊ लाड यांनी प्रकाश टाकला . त्यात माझी सुन योगायोगाने डॉ . असून परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दगडे बाई शिक्षित नसल्याने मला त्या भेटायला आल्यावर मी त्यांना ” आशीर्वाद ” देखील दिला , मात्र आता ही ” चर्चा ” वेगळ्या वळणावर जात असून सुधाकर घारे यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे , हे सांगत परिवर्तन विकास आघाडीचे सुधाकर घारे यांनी माझ्याकडे प्रस्ताव सादर करून तुमची सून आमच्या आघाडीच्या उमेदवार झाल्यास आम्ही निवडून आणू , हे म्हटल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले . मात्र आता डॉ . स्वाती लाड यांचा फोटो टाकून चुकीचे मेसेज करत आहेत , ” सत्तेचा उपभोग , आपका स्वार्थ , आपका विकास , माजी आमदारांची सुनबाई ” , असे ” ट्रोल मेसेज ” केले जात असल्याचे त्यांनी सांगितले , असे मेसेज मुळे माझे मन व्यथित झाले , असे मेसेज करणे मोठ्या व्यक्तीला शोभत नाही , १० दिवसांपूर्वी मला म्हटले तुमच्या सुनबाई आमच्या उमेदवार म्हणून द्या , मग आता लगेच बोलण्यात परिवर्तन कसे झाले ? असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला .
त्यांनी अजून एक खुलासा केला की , दगडे बाईला शिक्षण नाही , मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत लोकशाहीमध्ये कुणीही व कुठेही उभे राहू शकतो , अश्या तुलना करणे चुकीचे असून दगडे बाई माझ्या भगिनी आहेत , पहिल्या पासून सहकारी आहेत , महिलांच्या बाबतीत कुणीही असे बोलू नये , ” निकाल ” काहीही लागो , मात्र महिलांचा आदर करणे गरजेचे आहे . मी काँग्रेस पक्षापासून काम केले आहे , सर्वांना निवडून दिले आहे , स्वतःचा विकास मी कधीच केला नाही , कुणी व्यक्तिगत व्यवसायावर बोलू नये , परिवर्तन विकास आघाडीचे नितीन सावंत म्हणतात , मला घराणेशाही संपुष्टात आणायची आहे , नष्ट करायची आहे , मात्र यावर सुरेश भाऊ लाड म्हणाले की , मुद्रे गावात गेले तर , बैलमारे , पालकर हे कुटुंब , कर्जत पाटील आळी येथे गेल्यास रमेश चंदन पाटील , अनंत काका जोशी , हे आठवतात , म्हणूनच रमेश चंदन हे प्रथम नगराध्यक्ष झाले , अनंत काका जोशी हे सरपंच तर यांची सून सुवर्णा जोशी , नगराध्यक्ष म्हणून त्यांनी चांगली छाप पाडली , गुंडगे येथे गेल्यास वसंत सुर्वे , उमेश गायकवाड , हे चांगले काम करतात , म्हणजे ही काय या कुटुंबाची घराणेशाही आहे का ? आता दहिवली येथे लाड कुटुंब रहातात , म्हणून आमची काही घराणेशाही नाही , येथे कुणाची सावकारी नाही . असे स्पष्ट करत दहिवली येथे पाण्याचा प्रश्न पेटला , स्मशान भूमी नव्हती , घरांवर कारवाई झाली , कोर्टात केसेस झाल्या , त्यावेळी महाराष्ट्रात प्रथमच मी दहिवली सरपंच असताना घरांना घरपट्टी व नंबर दिले , अनेक नागरी सुविधा दिल्या , असा ” वलय ” लाड कुटुंबाच्या भोवती आहे , १९७७ पासून मी राजकारणात कार्यरत असताना ही घराणेशाही नव्हे , राजेश अडीच वर्षे नगराध्यक्ष राहिला मग महिला नगराध्यक्षा झाल्या , मी माझ्या मुलीला उभी केली , का तर पक्षाकडे कोण उमेदवार नव्हता , बिकट परिस्थिती होती , पराभव झाला , आम्ही स्वीकारलं , आता नितीन सावंत यांना कुठली घराणेशाही संपवायची आहे ? असा सवाल त्यांनी उपस्थित करत , मी विधानसभा निवडणुकीत त्यांचं काम केलं नाही म्हणून का ? याचा खुलासा करत अश्या प्रकारे चुकीचे बोलणे आहे , तुम्ही तुमचा प्रचार करा , आम्ही आमचा प्रचार करू , उमेदवार निवडून आणायचे काम करा , मात्र बोलून शब्द मागे राहतात , असा अपप्रचार करून तुमचा स्वभाव पुढे आणत आहेत , अशी कोपरखळी त्यांनी लगावली .
कर्जत मध्ये अनेक समस्या आहेत , त्या सोडविण्यासाठी , मी एक जबाबदार व्यक्ती म्हणून माझ्या भाजप पक्षाच्या व महायुतीच्या उमेदवार , डॉ. सौ. स्वाती अक्षय लाड यांना माझी सुनबाई म्हणून नव्हे , तर नगर परिषदेत नवनवीन उपक्रमाचा अभ्यास करता यावा म्हणून ” शिक्षित नगराध्यक्ष ” असणे गरजेचे असल्याने त्यांना निवडून द्या , असे आवाहन त्यांनी कर्जतकर नागरिकांना केले . मी त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करणार नाही , त्यांचे पती हे सिव्हिल इंजिनियर आहेत , कॉन्ट्रॅक्टर आहेत , ते देखील कधीच हस्तक्षेप करणार नाहीत , कर्जत नगर परिषदेत स्वतंत्र कारभार होणार आहे , असे परिवर्तन विकास आघाडीचे पदाधिकारी यांनी सोशल मीडियावर केलेल्या टीकेवर माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी सडेतोड उत्तर पत्रकार परिषदेत दिले .




