…..” पक्ष हितासाठी माघार , आता विजयासाठी वज्रमूठ “……
पक्ष नेतृत्वाचा " आदर " करत प्रभाग क्रमांक ३ मधून " भाजप मा. युवती प्रमुख ॲड सुषमा ढाकणे " यांची माघार !

कर्जत न. प. वर ” कमळ ” फुलण्यासाठी जोमाने प्रयत्न करणार……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महायुतीतून ओबीसी महिला ” थेट नगराध्यक्ष ” पदाची जागा मिळाली आहे , तर इतर प्रभागात देखील ७ जागा मिळाल्या असल्याने भाजप पक्ष श्रेष्ठी खूपच ” सावधगिरीने ” पावले टाकत असल्याचे दिसून येत आहे . म्हणूनच ज्या ज्या भाजप उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले होते , त्यांच्याशी ” सुसंवाद ” साधून पक्ष हितासाठी व पक्ष नेतृत्वाचा आदर करून उमेदवारी मागे घेण्यासाठी केलेले प्रयत्न अखेर सफल ठरले आहेत . त्याचेच फलित म्हणून प्रभाग क्रमांक ३ मधून ” भाजप माजी युवती प्रमुख ॲड सुषमा ढाकणे ” यांनी अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज आज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मागे घेतला .
भाजप पक्षात प्रथम ” देश ” नंतर ” पक्ष ” व त्यानंतर ” आपण स्वतः ” असे पक्षीय धोरण असल्याने भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण , आमदार प्रशांत दादा ठाकूर, माजी आमदार सुरेश भाऊ लाड , जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी , उपाध्यक्ष वसंत शेठ भोईर , जिल्हा सचिव रमेश दादा मुंढे , मा. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , मंडल अध्यक्ष राजेश दादा लाड , शहर अध्यक्ष विजय जिनगिरे , या पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय योग्यच असून मला ” काही कारणास्तव ” उमेदवारी दिली गेली नव्हती , म्हणून मी कर्जत नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ३ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता . मात्र पक्ष हितासाठी व पक्ष नेतृत्वाचा आदर करत आज उमेदवारी अर्ज माघार घेतला असल्याचे ” भाजप माजी युवती प्रमुख ॲड सुषमा ढाकणे ” यांनी मत व्यक्त केले .
कर्जत नगर परिषदेत भाजपाच्या डॉ स्वाती अक्षय लाड या नगराध्यक्ष पदाच्या महायुतीतून उमेदवार असून व इतर मिळालेल्या उमेदवारांसाठी संपूर्ण ताकदीने भाजप व महायुती निवडणुकीस विजयासाठी ” वज्रमूठ ” तयार करून ” सज्ज ” झाली असून नक्कीच या निवडणुकीत कर्जत नगर परिषदेवर महायुतीचे कमळ फुलणार , असा विश्वास ॲड सुषमा ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला .



