…..” नगर परिषद निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सज्ज “……
कर्जतमध्ये प्रदेशाध्यक्ष " सुनीलजी तटकरे " यांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्ष प्रवेश !

जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांचा ” जलवा ” कायम…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
विकृत ” विकृती ” येथून घालवायची असेल तर तुम्ही – आम्ही सर्व एकत्र येण्याची गरज असून , येथील राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांनी ” सज्ज ” व्हा , असे आवाहन करत माझ्यावर बोलणाऱ्यांची ” पात्रता ” काय आहे , हे सामान्य जनतेला माहीत आहे , असे ” खडे बोल ” येथील आमदार महेंद्र थोरवे यांचे नाव न घेता सुनावत कर्जत – खोपोली – माथेरान या नगर परिषदेवर ” राष्ट्रवादीचा झेंडा ” फडकवा , असे आवाहन ” कोकणचे भाग्य विधाते ” तथा खासदार सुनीलजी तटकरे यांनी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसमुदायास केला . ते कर्जतमध्ये रॉयल गार्डन च्या भव्य सभागृहात आयोजित केलेल्या विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलत होते .
यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे , जिल्हा कार्याध्यक्ष अशोक शेठ भोपतराव , जिल्हा प्रवक्ते भरत भाई भगत , ज्येष्ठ नेते दत्ताजी मसुरकर , कर्जत ता. अध्यक्ष दिपक श्रीखंडे , कर्जत शहर अध्यक्ष भगवान शेठ भोईर , जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ दादा धुळे , युवा जिल्हाध्यक्ष अंकित साखरे , प्रदेश उपाध्यक्ष तथा खोपोली मा. नगराध्यक्ष सुनील पाटील , जे पी पाटील , अश्विनी पाटील , मा. बांधकाम सभापती बंधू पाटील , पंकज पाटील , राम राणे , मधुकर भाऊ घारे , युवा अध्यक्ष शैलेश पालकर , प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव , शहर अध्यक्ष मधुरा चंदन पाटील , मा. नगरसेविका पुष्पा दगडे , मनिषा ठोंबरे , खालापूर अध्यक्ष संतोष बैलमारे , केतन बेलोसे, त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
कर्जत – खोपोली – माथेरान नगर परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांना ” धक्का ” देत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी अचूक खेळी खेळून प्रदेशाध्यक्ष तथा कोकणचे धुरंधर नेते , खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पक्षातील मातब्बर नेते , पदाधिकारी , मा. नगरसेवक , कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश व अनेकांना पद नियुक्ती सोहळा गुरुवार दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी रॉयल गार्डन, कर्जत येथे भव्य सभागृहात पार पडला .
यावेळी सुनीलजी तटकरे पुढे म्हणाले की , या मतदार संघावर मा. आमदार तुकाराम आण्णा सुर्वे , आमदार सुरेश लाड यांनी या ठिकाणी नेतृत्व केले आहे , याची आठवण त्यांनी केली . यावेळी त्यांनी माथेरान अजय सावंत , व कर्जत नगर परिषद पुष्पा दगडे यांना थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले . मात्र खोपोली नगराध्यक्ष पदाचे सस्पेन्स कायम ठेवले . यावेळी राजिपचे माजी अर्थ व बांधकाम सभापती पुंडलिक पाटील, शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, माजी नगरसेविका सौ. पुष्पा हरिश्चंद्र दगडे, मनसेचे जिल्हा सचिव जे. पी. पाटील, खोपोली चे युवा नेते दिनेश जाधव, मा. नगरसेवक चंद्रप्पा अनिवार, बी एस पी चे मा. विधानसभा अध्यक्ष योगेश आप्पा गायकवाड, कर्जत तालुका धनगर समाज अध्यक्ष तुकाराम बाबू आखाडे, बाबू धोंडू ढेबे , रामचंद्र नारायण ढेबे, अभिजीत विजय राणे, राजेंद्र साखरे, मा. नगरसेवक मधुकर दळवी, मा. नगरसेविका मेधा वाडकर, मा. नगरसेविका चंद्रभागा चंद्रप्पा अनिवार, शिवसेना शिंदे गट बीड जिल्हा परिषद विभाग संघटक मनोज वसंत बोडके, माथेरान शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. स्नेहा संतोष चव्हाण, खरीवली पंचायत समिती शिवसेना सहसंघटक सतीश बाबाजी मोरे, युवासेना शाखाप्रमुख झाडाणी शंकर रखमाजी मोरे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. या ” न भूतो न भविष्यती ” अश्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वाढली आहे .



