महाराष्ट्र

” मा. नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड मॉर्निंग वॉक ग्रुपचा स्तुत्य उपक्रम “…..

गुंडगे येथे ” जीवनाच्या अंतिम ” प्रवासाच्या स्थळी केली स्वच्छता मोहीम !

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागातील ” स्मशानभूमी ” येथे या प्रभागाचे ” मा. नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड मॉर्निंग वॉक ग्रुप ” च्या सदस्यांनी आज रविवार दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी येथील परिसराची वाढलेले गवत व इतर घाण काढून स्वच्छता केली . या स्वच्छता मोहिमेत कर्जत नगर परिषदेच्या कर्मचारी वर्गानेही मदत केली .
०१ जुलै २०२५ रोजी मा. नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ” जीवनाच्या अंतिम स्थळा ” चे म्हणजेच स्मशानभूमीचे सुशोभीकरण करून लोकार्पण सोहळा पार पडला होता , तर याच ठिकाणी त्यांचा आगळा वेगळा वाढदिवस देखील केक कापून साजरा केला होता . यावेळी मा. नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड यांनी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या मदतीने दर १ महिन्याने येथील स्वच्छता करण्याचा ” मानस ” केला होता , मात्र त्यानंतर पावसाळा आल्याने हे मदतकार्य राहून गेले . म्हणूनच आज या उमेश आप्पा गायकवाड मॉर्निंग वॉक ग्रुपने गुंडगे स्मशान भूमी परिसरात सर्व साफसफाई करून स्वच्छता केली .

जीवनाच्या ” अंतिम स्थळा ” च्या प्रवास स्थळी ” अंतिम संस्कार ” करताना व येणाऱ्या दुःखद नागरिकांना येथील परिसरात विधी करण्यास अडचणी येऊ नये , परिसरात बसण्यासाठी परिसर स्वच्छ असावा , हा उदात्त हेतू मनाशी ठेवून गुंडगे स्मशानभूमीत दर १ महिन्याने या परिसराची स्वच्छता मी व माझा मॉर्निंग ग्रुप सदस्य करणार असल्याचे मत मा. नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड यांनी याप्रसंगी मत व्यक्त केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!