महाराष्ट्र

” कर्जत नगर परिषद निवडणुका मनसे लढणार स्वाभिमानाने “…..

स्वबळावर ” थेट नगराध्यक्ष ” पदासोबत सर्व जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता !

जिल्हाध्यक्ष ” जितेंद्र दादा पाटील ” यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष ” राजेश साळुंखे ” ऍक्टिव्ह…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

कर्जत नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुका ०२ डिसेंबर २०२५ रोजी होत असल्याने थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण महिला ओबीसी पडल्याने हि निवडणूक ” महाराष्ट्र नवनिर्माण सेना ” स्वाभिमानाने लढणार असून स्वबळावर थेट नगराध्यक्ष पदासोबत सर्व जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता असून याबाबतीत मनसे जिल्हाध्यक्ष ” जितेंद्र दादा पाटील ” यांच्या नेतृत्वाखाली कर्जत शहर अध्यक्ष ” राजेश साळुंखे ” हे ऍक्टिव्ह झाले असून नुकतीच मनसेची महत्त्वपूर्ण बैठक कर्जतमध्ये पार पडली , या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन चाचपणी करण्यात आली .

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांच्या आघाडीत महाराष्ट्र नव निर्माण सेना सामील झाली होती . त्यावेळी संपूर्ण ताकदीनिशी सहकार्य करणाऱ्या मनसेला आता कर्जत नगर परिषद निवडणुकीत स्थापन झालेल्या परिवर्तन विकास आघाडीत मानाचे स्थान व मनाजोगे जागा मिळतील तरच ” स्वाभिमानाने ” त्यात सामील होणार की ” स्वबळाचा ” नारा देणार हे येणाऱ्या रविवार दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाची भूमिका जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील जाहीर करणार आहेत . या मेळाव्यात अनेकांचा पक्ष प्रवेश देखील होणार आहे , शिवाय उमेदवार देखील जाहीर होणार असल्याने या मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे .
मनसेने पदाधिकारी व मनसे सैनिकांची मते जाणून घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांनी बैठक आयोजित केली होती . या महत्वपूर्ण बैठकीस मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांच्या समवेत मनसे विद्यार्थी सेना रायगड जिल्हाध्यक्ष प्रसन्न बनसोडे , रायगड जिल्हा सचिव अक्षय महाले , कर्जत तालुका अध्यक्ष यशवंत भवारे , कर्जत शहर अध्यक्ष राजेश साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

सदर बैठकीत मनसे कर्जत तालुका सचिव प्रदीप पाटील, मनसे मा. नगरसेवक हेमंत ठाणगे, मा. नगरसेवक धनंजय दुर्गे, मंगेश काणेकर , कर्जत शहर उपाध्यक्ष मितेश महापुरे , महेंद्र गायकवाड , भारती कांबळे , मनसे विद्यार्थी सेना कर्जत शहर अध्यक्ष अवधूत अत्रे , महेश लोवंशी आदी पदाधिकारी व मनसे सैनिक उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!