…..” कर्जत थेट नगराध्यक्ष पदी मा. नगरसेविका पुष्पाताई दगडे तर माथेरान साठी अजय सावंत “…..
कर्जतमध्ये पक्ष प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष " सुनीलजी तटकरे " यांनी केली घोषणा !

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
खोपोली नगराध्यक्ष पदाचे ” सस्पेन्स ” कायम……
कर्जत – माथेरान – खोपोली या नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झाली असून पक्ष प्रवेशांचा कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर असून नुकतेच या तीन हि नगर परिषद हद्दीतील विविध पक्षातील अनेक मा. नगरसेवक , पदाधिकारी , कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार ” सुनीलजी तटकरे ” यांच्या प्रमुख उपस्थितीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांच्या मार्गदर्शनाखाली धूमधडाक्यात पार पडला .
यावेळी प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी कर्जत नगर परिषद ओबीसी महिला आरक्षण थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून मा. नगरसेविका ” पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे ” तर माथेरान नगर परिषद थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून ” अजय सावंत ” यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली . तर खोपोली नगर पालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांनी घोषित केले नसल्याने कुठल्या उमेदवाराची घोषणा होते , हे ” सस्पेन्स ” कायम ठेवले .
खोपोली थेट सर्वसाधारण नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी कडून ज्येष्ठ नेते तथा मा. नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर व मा. नगराध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष सुनील पाटील हे इच्छुक आहेत . या दोन पैकी कुणाच्या नावाची घोषणा होते ? की अजून कुठल्या दुसऱ्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होते ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे .



