Uncategorized

इथला ” कायापालट ” घडवायचा असेल तर ” पुष्पाताईंच्या ” हाती सत्ता द्या – उपमुख्यमंत्री अजित दादा पवार

विकास करून " कर्जतमध्ये " घडवणार बारामती मॉडेल !

अभूतपूर्व गर्दीत ” विजयाची ” नांदी…..

 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगरीत भरपूर समस्या आहेत , कर्जत नगरीत जर ” बारामती मॉडेल ” बनवायचे असेल , इथला ” कायापालट ” घडवायचा असेल तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ” पुष्पाताईंच्या ” हाती सत्ता द्या , असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मान . ” अजित दादा पवार ” यांनी कर्जतमध्ये लोकमान्य टिळक चौकात आयोजित केलेल्या कर्जत नगर परिषद निवडणुकीत ” परिवर्तन विकास आघाडी ” च्या प्रचार सभेत त्यांनी केले .

यावेळी विचार पिठावर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे , मा. राजिप सदस्य राजू साबळे , रायगड जिल्हाध्यक्ष तथा मा. राजिप उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे , शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत , राजिप चे मा. बांधकाम सभापती बंधू पाटील , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव , राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते भरत भाई भगत , जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ दादा धुळे , कर्जत ता. अध्यक्ष दिपक भाई श्रीखंडे , कर्जत शहर अध्यक्ष भगवान शेठ भोईर , महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंढे , ज्येष्ठ नेते राम शेठ राणे , शेकाप चिटणीस विलास भाई थोरवे , आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड , जिल्हा उपाध्यक्ष अशोक शेठ सावंत , पंकज पाटील , संघटक बाबू घारे , मोहन ओसवाल , कर्जत ता. प्रमुख बाजीराव दळवी , विधानसभा अध्यक्षा ॲड . पूजा सुर्वे , ता. अध्यक्षा ॲड रंजना धुळे , ठाकरे सेनेचे सुरेश बोराडे , राष्ट्रवादी ता. युवा अध्यक्ष पालकर , युवा नेते केतन बेलोसे , उमेश आप्पा गायकवाड , राजिप सभापती नारायण डामसे , व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ . पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे , त्याचप्रमाणे परिवर्तन विकास आघाडीचे २१ उमेदवार यावेळी उपस्थित होते .

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मशिदीत ” बांग ” झाल्यावर , धर्मनिरपेक्ष पणाचा आदर करणारे आम्ही व आमचा पक्ष असल्याने बांग ऐकू आल्यावर ती संपेपर्यंत दादा थांबले , व दादांनी भाषण बंद केले होते . ते पुढे म्हणाले की , निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी जशी परिस्थिती असेल तशी आघाडी करा , असे आम्ही सांगितले होते . परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ” सौ. पुष्पाताई दगडे ” या कर्जत नगर परिषदेवर ” ३ वेळा ” निवडून गेल्या आहेत , यावर प्रकाश टाकत त्या ” श्री महालक्ष्मी बचत गटा ” च्या संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी तब्बल ५५ बचत गट त्यांनी स्थापन केले आहेत . पुष्पाताई कधीच कामाबद्दल तडजोड करत नाहीत , म्हणूनच येथील वाहतुकीची समस्या , आरोग्य , स्वच्छता , रस्ते , या सर्व समस्या दूर करण्यासाठी कुठल्याही टिकेला उत्तर न देता कामाने उत्तर देण्यासाठी ” पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे ” व परिवर्तन विकास आघाडीचे सर्व ” उमेदवारांना ” भरघोस मतांनी विजयी करा , असे आवाहन त्यांनी समस्त कर्जतकर नागरिकांना केले .

या मतदार संघात देखील मैत्रीपूर्ण लढत झाली असती तर ” सुधाकर घारे ” इथे आमदार झाले असते , हे महत्त्वपूर्ण विधान करून इथे गुंडगिरी – दादागिरी वाढलेली आहे , विकासा बद्दल मी कुठलाच भेदभाव करत नाही , म्हणूनच इथला कायापालट घडवायचा असेल तर पुष्पाताईंच्या हाती सत्ता द्या , सर्व परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवारांना बहुमताने निवडून द्या , असे आवाहन पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केले . यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले . परिवर्तन विकास आघाडीच्या या सभेला अभूतपूर्व गर्दी होती .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!